मुंबई: शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना एरव्ही लोकसभेच्या उमेदवारांची यादी ‘सामाना’ या मुखपत्रातून प्रसिद्ध करते. मात्र यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: ही यादी जाहीर करण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्रातील 48 पैकी 23 लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे. उरलेल्या 25 जागांवर भाजपचे उमेदवार असतील. शिवसेनेच्या या पहिल्या यादीत कुणा कुणाला स्थान मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याबाबतीत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तीन जागांवरुन तिढा
शिवसेनेच्या तीन लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम आहे. मावळमध्ये शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा विरोध कायम आहे. तर परभणी लोकसभा मतदारसंघात राहुल पाटील आणि संजय जाधव यांच्यात कडवा विरोध सुरू आहे.
शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती
उस्मानाबादमध्ये शिवसेनेचा निर्णय अद्याप झालेला नाही. सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, खासदार रवींद्र गायकवाड मकरंदराजे निंबाळकर यांच्या नावावर खल सुरू आहे. विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचं तिकीट अद्याप कन्फर्म नाही.
शिवसेनेतील अजातशत्रू अनिल खोचरे यांचा सर्वपक्षीयांशी असलेल्या संपर्कामुळे तेही इच्छुक आहेत. शिवसेनेचा 30 वर्षांपासून असलेला एकनिष्ट शिवसैनिक म्हणून खोचरेंना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. खोचरेंचे भाजपचेही सौर्हादाचे संबंध आहेत. गायकवाड यांची प्रतिमा नॉट रिचेबल खासदार म्हणून ‘मातोश्री’वर सांगण्यात आली आहे. तर मकरंदराजे यांच्या हॉटेलचे बांधकाम नियमबाह्य आहे, त्यामुळे उमेदवारी बाद होऊ शकते, मकरंदराजे पक्षांतर करण्यासाठी ओळखले जातात. ते मूळचे राष्ट्रवादीचे आहेत.
ओमराजे हे तेरणा साखर कारखाना बुडीत काढणारे म्हणून ओळखले जातात, त्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नाराज आहेत. ही सगळी मतदारसंघातील पार्श्वभूमी पाहता ‘मातोश्री’वर उमेदवार निवडीबाबत खल सुरु आहे.
भाजपचीही पहिली यादी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवाराची पहिली यादी आज जाहीर करण्याची शक्यता आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सदानंद गौडा यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीबाबत भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक होत आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळपर्यंत भाजप आपल्या 100 उमेदवारांची घोषणा करु शकतं. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटकसह उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या जागांचा समावेश असेल.
संबंधित बातम्या
शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती
वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
गडकरींविरुद्ध नाना पटोलेच लढणार, काँग्रेसकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर
राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, पार्थ पवार, अमोल कोल्हेंना उमेदवारी
आघाडीच्या घोषणेपूर्वीच राष्ट्रवादीने राजू शेट्टींना जागा सोडली!