मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाचा दबदबा; मनसेनेही खाते उघडले

| Updated on: Oct 17, 2022 | 5:07 PM

आतापर्यतच्या मतमोजणीत सर्वाधिक सरपंच ठाकरे गटाचे निवडणून आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाचा दबदबा; मनसेनेही खाते उघडले
Follow us on

ठाणे : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाचा दबदबा पहायला मिळत आहे. तर, येथे मनसेनेही खाते उघडले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली असून आतापर्यतच्या मतमोजणीत सर्वाधिक सरपंच ठाकरे गटाचे निवडणून आले आहेत. तर, मनसेने खाते उघडत दोन ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे.

आतापर्यतच्या निकालात शिंदे गटाने 24 जागांवर यश मिळवले आहेत. तर, भाजपनेही 30 ठिकाणी यश मिळवले आहे. तर, ठाकरे गटाला व महाविकास आघाडीला मिळून 50 ग्रामपंचायतीवर झेंडा फडविकण्यात यश आले आहे.

मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा बोलबाला असल्याचे दिसून येत आहे. यापैकी 28 ग्रामपंचायतील सदस्य व सरपंचांनी कुठल्या पक्षाबरोबर जाणार असल्याची आपली भूमिका स्पष्ट मांडली नाही.

यामुळे या ग्रामपंचायती जर भाजप किंवा शिंदे गटाला मिळाल्या तर ठाणे जिल्ह्यावर शिंदे किंवा भाजपचे वर्चस्व पहायला मिळू शकते. मात्र, या ग्रामपंचायती महाविकास आघाडीला मिळाली तर ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडी चे वर्चस्व असल्याचे निकालांवरुन दिसत आहे.

विशेष म्हणजे ठाकरे आणि शिंदे गटातील सत्ता संघर्षानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 158 पैकी 31 सरपंच बिनविरोध निवडणून आले आहेत.

यामध्ये ठाकरे आणि शिंदे गटासह राष्ट्रवादी, भाजप या चारही राजकीय पक्षांचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. शिवाय 1 हजार 453 सदस्यांपैकी 487 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

तर, उर्वरित 119 उमेदवार हे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरे गटाला मतदारराजाने कौल दिल्याचे दिसून आले आहे.