मुंबईः आज शिवसेनेतील आमदार आणि भाजपच्या पाठिंब्याने पक्ष फुटल्याचे चित्र असले तरीही याची पायाभरणी राष्ट्रवादी पक्षाने केली. शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री केलं आणि शिवसेना संपवण्याचा डाव आखला, असा आरोप वारंवार करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत संजय राऊतांनी (Sanjay Raut) हाच नेमका प्रश्न विचारला. फुटिरांनी ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने नाराजी दर्शवली. तसेच शरद पवारांनी (Sharad Pawar) तुम्हाला मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली, असे म्हटले, यावर तुमचं काय मत, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. उद्धव ठाकरे यांनी यावर उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव न वापरता केवळ भाजपवर टीका केली. भाजपमुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेना संपली नसली तरीही पक्षात जे वादळ आलंय, त्यासाठी उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे भाजपलाच दोषी ठरवलं आहे.
शरद पवारांनीच शिवसेना संपवली असा आरोप केला जातोय, यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, या आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असे हे लोक म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक… त्यावेळेला भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवेल, असा यांचा आरोप होता. 2019 साली भाजपने खोटेपणाचा कळस केला. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून महाविकास आघाडीला आपण जन्म दिला. तेव्हा हे लोक आता काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्रास देतात, असे म्हणतायत. की हे लोक फक्त कारणं शोधतायत, हे पहावं लागेल, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
बंडखोरांना आधी भाजपबद्दल तक्रार होती, नंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार निघाली. त्यामुळे त्यांचं नेमकं कारण काय आहे, असा प्रश्न उद्ध ठाकरेंना विचारला असता ते म्हणाले, त्यांची लालसा यासाठी कारणीभूत आहे. स्वतःला मुख्यमंत्री पद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवलं. आता तर शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागली की ही आमची शिवसेना आहे म्हणून. अत्यंत घाणेरडा आणि दळभद्री असा हा प्रकार आहे, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं.
या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकररे म्हणाले, त्यांनी काहीही म्हणो, ते माझ्या कुटुंबाचेच घटक होते. मी भेटत नव्हतो. माझ्या ऑपरेशनच्या काळात मी हलू शकत नव्हतो. तेव्हा काय भेटू शकणार होतो. माझे हात-पाय चालत नव्हते. इथर वेळी हे आमच्या कुटुंबातील एक होते. निधीचं कारण देतात, तर अजित पवारांनीच सांगितलं की ह्यांच्या एका खात्याला बारा हजार कोटी रुपये दिले. एकदा मला निधी वाटपात असमानता दिसली, असं वाटलं तेव्हा मी स्थगितीही दिली होती. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसून आम्ही हा असामनतेचा प्रश्न सोडवलाही होता, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं.