पुणे : आमदार मुक्ता टिळक ( Mukta Tilak ) यांचे निधन झाल्यानंतर कसबा पेठ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीची जागा कॉंग्रेसला (Congress) सोडण्यात आली आहे. कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच कॉंग्रेसच्या बाबासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी न देता हेमंत रासणे ( Hemant Rasane ) यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय शिवसेना ठाकरे गटासोबत युती केलेल्या संभाजी ब्रिगेडच्या अविनाश मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कसबा पेठमध्ये उमेदवार नसतांना उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा कुणाला अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतांना पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहे. त्यामध्ये कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडच्या दोन्ही भाजपच्या दोन्ही विद्यमान आमदारांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
त्यामध्ये भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा सरळ सामना होणार आहे. मात्र, बंडखोरी आणि इतर पक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पोटनिवडणुकीत रंगत आली आहे.
बिनविरोध होतील अशी शक्यता असणाऱ्या निवडणुकीत लढत अधिक ताकदीची होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांचा उमेदवार नसला तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागणार आहे.
याशिवाय शिवसेना ठाकरे गटासोबत युती केलेल्या संभाजी ब्रिगेडची युती आहे. संभाजी ब्रिगेडच्या अविनाश मोहिते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून गुरुवारी प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.
लाल महालात जिजाऊंच दर्शन घेऊन प्रचाराला करणार सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा कॉंग्रेसला की संभाजी ब्रिगेडला असणार अशी चर्चा पुण्यातील राजकारणात होऊ लागली आहे.
कॉंग्रेसकडून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करत भाजपच्या हेमंत रासने यांच्या विरोधात प्रचारही सुरू केला आहे. मात्र, दुसरीकडे ठाकरे यांच्या पाठिंब्याबाबत कुठलीही स्पष्टता नाहीये.
त्यातच संभाजी ब्रिगेडने कसबा पेठची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला असून प्रचाराची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वाची असणार आहे. उद्धव ठाकरे यांना भूमिका जाहीर करतांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्तेही याबाबत कुजबूज करू लागले असून ठाकरे कुणाच्या बाजूने आहे किंवा असणार आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.