‘नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात’, शरद पवारांचा उखाणा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

बारामती : असं एकही क्षेत्र नाही, ज्यातली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना माहिती नाही. उखाणा घेण्यातही ते मागे नाहीत. इंदापुरातल्या एका महिलांसाठीच्या कार्यक्रमात उखाणा घेत शरद पवारांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. ‘नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात’ हा उखाणा त्यांनी घेतला. इंदापूर बाजार समितीच्या वतीने शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं […]

नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात, शरद पवारांचा उखाणा
Follow us on

बारामती : असं एकही क्षेत्र नाही, ज्यातली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना माहिती नाही. उखाणा घेण्यातही ते मागे नाहीत. इंदापुरातल्या एका महिलांसाठीच्या कार्यक्रमात उखाणा घेत शरद पवारांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. ‘नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात’ हा उखाणा त्यांनी घेतला.

इंदापूर बाजार समितीच्या वतीने शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. याबाबत बोलताना शरद पवार यांनी मोठ्या कुतुहलाने उखाणा स्पर्धेबद्दल विचारणा केली. त्यावर या स्पर्धा संध्याकाळच्या सत्रात घेणार असल्याचं निवेदिकेने सांगितलं. मात्र शरद पवार यांनी मला वाटलं आमच्यासमोरच कोणीतरी उखाणा घेईल, असं वाटलं होतं असं म्हणत या निवेदिकेलाच उखाणा घ्यायला सांगितला.

त्यावर या निवेदिकेने लांबलचक उखाणा घ्यायला सुरुवात केली. त्यावर पटकन नाव घ्या हो.. असं म्हणत पवारांनी या निवेदिकेला उखाणा पूर्णही करायला लावला.. त्यानंतर शरद पवार यांनी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांना उखाणा घेताय का अशी विचारणा केली.

एका कार्यकर्त्याने उत्साहात उखाणाही घेतला.. त्यानंतर मात्र पवारांनी उखाणा कसा सोप्या आणि सरळ भाषेत असावा असं म्हणत ‘नावाची काय बिशाद ; प्रतिभा माझ्या खिशात’ असं हातवारे करत उखाणा घेतला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.

याच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळ्या वाजवत शरद पवार यांच्या उखाण्याला दाद तर दिलीच.. मात्र माईकजवळ येत आता संध्याकाळी बाबांना घरी आईकडून नो एंट्री होईल.. हे रेकॉर्ड करु नका नाहीतर बाबांना घराबाहेरच झोपावं लागेल, असं म्हणत उपस्थितांमध्ये हास्य फुलवलं.

पाहा व्हिडीओ :