उल्हासनगर : भाजप आणि शिवसेनेत उल्हासनगर मनपात रस्सीखेच आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या उल्हासनगरची सत्ता खेचून आणण्यासाठी राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे. गेल्या निवडणुकीत 78 पैकी 33 जागा जिंकत भाजपनं सत्ता आणली होती. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. यावेळी जागा वाढल्या आहेत. प्रभागरचनेतही बदल झाला आहे. आरक्षण बदलल्यानं योग्य असा प्रभाग शोधण्याच्या कामाला उभेच्छुक लागले आहेत. उल्हासनगरात पप्पू कलानी (Pappu Kalani) यांच्या नावाचं गारुड होतं. त्यांच्यानंतर त्यांच्या नवीन पिढीनं सूत्र हाती घेतली. भाजपनंतर त्यांना हातावर घड्याळ बांधलं. त्यामुळं उल्हासनगर महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation Election) रंगतदार होणार आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. मात्र, उल्हासनगरात कलानी यांच्या सुनेसह इतर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) जवळ केलं.
उल्हासनगर महापालिका प्रभाग 24 अ
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
उल्हासनगर महापालिकेत 30 प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक 24 ची लोकसंख्या 16 हजार 938 आहे. त्यापैकी 1 हजार 282 लोकसंख्या ही अनुसूचित जातीची, तर 427 लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे. उल्हासनगर महापालिकेत एकूण 89 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 15 जागा राखीव आहेत. त्यात 8 महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी एक जागा महिलांसाठी राखीव आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये 24 पैकी 12 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण गटाच्या 49 जागांपैकी 45 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग 24 मध्ये अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग ब मध्ये सर्वसाधारण महिला तर प्रभाग क मध्ये सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. गेल्या निवडणुकीत प्रभाग 24 मधून महेश सुखरामनी निवडून आले होते.
उल्हासनगर महापालिका प्रभाग 24 ब
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
इतर |
उल्हासनगर मनपा हद्दीतील नशीब चिकन सेंटर, महालक्ष्मी रेस्टॉरंट, एसएसईबी कार्यालय परिसर, योगेश नगर, दुलारी पाडा, गणेशनगर, गुरुसंगत दरबार, महावीर हॉस्पिटल मागील बॅरेक, पारस डेली माली परिसर, तुलसी दरबार, शिवसागर कॉलनी, कलानी सोसायटी, रोशन अपार्टमेंट, वीनस चौक, कृष्णताई माने प्रवेशद्वार, सत्यसाई शाला परिसर, शिवनेरी हॉस्पिटल, पाच दुकान, देवसमाज रोड, ब्रम्हकुमारी पीस पार्क, बाबासाई नगर, डायमंड अपार्टमेंट, शिवसागर कॉलनी परिसर, रामरक्षा हॉस्पिटल, एसएसटी कॉलेजमागील बाजू,कृष्णानगर एरिया, स्वामी शांती प्रकाश पुतला परिसर, शांतीसागर अपार्टमेंट, तारानी हाऊस, गुलमोहर रेसिडन्सी व मोक्ष महल. उत्तरेकडं उल्हासनगर मनपा हद्दीत नशीब चिकन सेंटरपासून जय भिम चौकापर्यंत, पूजा ब्युटी पार्लर, कुष्णकुंज अपार्टमेंट, सद्गुरु पॅलेस, बिअर बारच्या रस्त्याने, संत रामदास हॉस्पिटलमार्गे, तुलसीदास दरबारकडे मार्ग शाळा, बझीरानी हाऊस, केशवानी घर, गणपती मंडळ, पुतली अपार्टमेंट, सुखमणीसागर, अपार्टमेंट मार्ग धनगुरु पॅलेस, बीके. के. डायग्नोस्टिक्स, महावीस हॉस्पिटलपर्यंत. मास्टर वाईन मार्ग व्हिनस चौक, रतनसोप, किरणताई बाळकृष्ण माने प्रवेशद्वार, शमशान भूमीमार्ग, कालीमाता मंदिर ते संभाजी चौक, न्यू अमरदीप मार्ग, भीम चौकापर्यंत. राहुलनगर चौक.
उल्हासनगर महापालिका प्रभाग 24 क
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
मनसे | ||
इतर |