मुंबई : एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच रात्री उशिरापर्यंत नेते मंडळी सक्रिय असल्याचं पहायला मिळतं. काल (सोमवारी) रात्री एक वाजताच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गाडी ‘टीव्ही9 मराठी’च्या कॅमेऱ्यात कैद झाली. यावेळी पवारांच्या गाडीत तोंड लपवणाऱ्या एका व्यक्तीने लक्ष (Unidentified Man with Sharad Pawar) वेधून घेतलं.
शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे सिल्व्हर ओकमधील निवासस्थानाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत गाडीत असलेल्या आणखी एका व्यक्तीने गूढ वाढवलं आहे. कॅमेरा समोर येताच या व्यक्तीने आपला चेहरा जाणीवपूर्वक लपवला.
शरद पवार यांच्या बाजूला बसलेली ही व्यक्ती नेमकी कोण होती, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या व्यक्तीने तोंड लपवल्यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणली गेली आहे.
शरद पवारांच्या गळाला मोठा मासा लागला की काय, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. ही व्यक्ती राष्ट्रवादीतील कोणी पदाधिकारी होती, काँग्रेस किंवा शिवसेनेमधील कोणी होती, की भाजपच्या गोटातून एखादा नाराज किंवा बंडखोर नेता पवारांच्या साथीला आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आज राज्याच्या राजकारणात आणखी भूकंप पहायला मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु, उद्या अग्निपरीक्षा!
मुंबईतील हॉटेल ट्रायडंटवर अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये बैठक झाली. विशेष म्हणजे याच हॉटेल ट्रायडंटमध्ये सोमवारी (26 नोव्हेंबर) रात्री शरद पवार आणि सुप्रिया सुळेही येऊन गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी कुणाची भेट घेतली आणि कशासाठी याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय?
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test) लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. आता हंगामी अध्यक्षपदाबाबत उत्सुकता आहे (Protem Speaker Floor Test) .
ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही. त्याचं लाईव्ह चित्रीकरण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने (Supreme Court Verdict On Maharashtra Floor Test ) दिले आहेत. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करण्यासही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे.
Unidentified Man with Sharad Pawar