‘…जो नको म्हणतो त्याच्यामागे पळतं आणि ज्याला हवं त्याच्यापासून पळतं…, ‘ काय म्हणाले नितीन गडकरी ?

| Updated on: Jan 04, 2025 | 7:38 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सर्वपक्षात चांगले मित्र आहेत. त्यांच्या भाषणाला नेहमीच गर्दी होत असते. पुणे दौऱ्यांत देखील त्यांचे भाषण खूपच गाजले.

...जो नको म्हणतो त्याच्यामागे पळतं आणि ज्याला हवं त्याच्यापासून पळतं...,  काय म्हणाले नितीन गडकरी ?
nitin gadkari meets late girish bapat family in pune
Follow us on

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या दिलखुलास स्वभावामुळे सर्वपक्षात लाडके व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या योजनांची नेहमीच चर्चा होते. परंतू अलिकडे भाजपाचे मंत्रीपद नाकारलेले नाराज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांवर समोर नाराजी व्यक्त करीत नितीन गडकरी यांची आधी भेट घेतली होती. केंद्रीय नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राजकारणावर वक्तव्य केले आहे. सत्ता असेल तेथे सर्वजण जातात आणि एकदा सत्ता गेली की उंदीर जसे जहाज बुडताना सर्वात आधी उड्या मारतात तसेच हे आहे,शेवटी विचार महत्वाचा आहे असेही नितीन गडकरी यांनी यावेळी म्हणाले.

हुशार असणे आणि यशस्वी होणे यात फरक आहे. अनेक समाजांनी मिळून आपला देश बनला आहे. राजकारणाबद्दल माझे मत फारसे चांगले नाही.येथे केवळ युज आणि थ्रो होतो. पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक आहे असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले. जातीय अस्पृश्यता वाईट असून ती समाप्त झाली पाहीजेत. अभिनेते रजनीकांत माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे. आणि ते माझ्याशी मराठीतच बोलतात. ते कर्नाटकात गेले आणि बस कंडक्टर बनले. आज तामिळनाडूत अभिनेते बनले, लोक त्यांना देव मानतात यात कुठे आडवी आली जात. शेवटी तुमची गुणवत्ता महत्त्वाची आहे असेही गडकरी म्हणाले.

राजकारणाच्या आपल्या मर्यादा आहेत. ज्याला समाज बदलायचा आहे. त्याच्यावर एकदा का पक्षाचा थप्पा लागला की त्याला मर्यादा येतात. आजकाल प्रत्येकाला आमदार, खासदार , मंत्री पदं पाहिजेत. नको कोणी म्हणणार नाही.राजकारणात असं होत की जो नको म्हणतो त्याच्या मागे पळतं आणि ज्याला हाव त्याच्या पासून पळतं. मी बावनकुलेला सांगितलंय माझ्या सभेला ५० लोक आले तरी चालेल, पण भाडोत्री गर्दी नको. मी अनेक आंदोलनात होतो ५० रुपये पण कोणी द्यायला तयार नव्हतं. पैसा आयुष्यातले साध्य नाही पण साधन आहे असेही गडकरी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

खेडकरांनी इमानदारीने नोकरी केली. सामाजिक जाणीव ठेवून मदत केली. गृहनिर्माण सोसायट्यांची काम घेणं आता सर्वपक्षीय धंदा झाला आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यात पण सुरु आहे. आदर्शाच्या कल्पनेवर १०० टक्के उतणारे राज्य कोणी असेल तर शिवाजी महाराजांनी केले आहे.मुलगा आहे म्हणून निर्णय त्याच्या बाजूने दिला नाही. अनेक लढाया जिंकल्या आणि अनेक राज्ये जिंकली पण कोणत्याही पण स्रियांवर अन्याय वा अत्याचार करणारी एकही घटना नाही.शिवाजी महाराज सेक्युलर असतील तर त्यांच्या इतका कोणी सेक्युलर झाला नाही. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नाही तर सर्वधर्मसमभाव आहे असे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

तेव्हा  लक्षात आलं की सरकार कसं चालतं?

मी एकदा मी एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी गेलो आणि सकाळी शौचालयाला जाऊ शकलो नव्हतो. त्यामुळे जिथे गेस्ट हाऊस आहे तिथून प्रवास सुरु होणार होता. मी अस्वस्थ होतो पण पण तेथे भयानक अनुभव आला. प्लास्टीकच्या पिशवीला पेंट केला होता. माझ केस उचकटले गेले. माझ्या डोळ्यातून पाणी आले. प्लास्टीक पिशवीलाही पेंट केला होता. मी विचारले तांबे साहेब हा ऑइल पेंट लावला आहे. असा प्रकार करणारा शहाणा कोण आहे? ते म्हणाले की संबंधित कर्मचाऱ्यांना  साहेब फार कडक आहेत. सगळे ऑइल पेंट करा, पडदे चांगले करा असे आदेश दिले होते, त्यामुळे हे घडलं…तेव्हा मला लक्षात आलं की सरकार कसं चालतं असे गडकरी यांनी सांगताच उपस्थितात एकच हशा पिकला.