भंडारा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भंडारा जिल्ह्यातील सहापदरी बायपासच्या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी नितीन गडकरी भंडारा जिल्ह्यात आहेत. या क्रार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर (Forest Department Officer) संतापले, असल्याचं दिसून आलं. काम न करणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे गोपीनय अहवाल (CR) खराब करणार असल्याचा इशारा नितिन गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरी आज भंडारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आज जाहीर सभेत भंडारा वन विभागातील काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
भंडारा जिल्ह्यातील पवनी रस्त्यात येणाऱ्या दवडीपार ते पहेला गावात पर्यंतच्या 5 किलोमीटरचा रस्त्या वनविभागाच्या अंतर्गत येत असून त्याला डी- नोटिफाईड करण्यात आले आहे.मात्र, वन विभागाचे काही निकम्मे अधिकारी काम थांबवून आहेत, असं नितीन गडकरी म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवले त्यावर तुम्ही मला काळे झेंडे न दाखविता या निकम्म्या अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखवा असा खोचक सल्ला ही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्याना दिला.
मी सरकार मध्ये आहे.तुम्ही मला या 3-3 वर्ष रस्त्याचे काम थांबवविणाऱ्या DFO आणि चीफ कन्झर्व्हेशनच्या अधिकाऱ्यांची नावे द्या मी सरकार आहे. या निकम्म्या वन अधिकाऱ्यांचा CR खराब करून कारवाई करणार, अशी तंबीच त्यांनी जाहीर कार्यक्रमात दिली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नाराजी ओढवून घेणाऱ्या वन अधिकाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. हे मात्र निश्चित झालं आहे.
हा जो रस्ता आहे भंडाऱ्याकडून पवनीकडे जातो या रस्त्याचं काम तीन तीन वर्ष खोळंबलेलं आहे. खर म्हणजे फॉरेस्टनं तो डीनोटिफाईड केला आहे. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी तो अडवून ठेवलेला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला काळे झेंडे दाखवले. काळे झेंडे दाखवले त्याबद्दल दु:ख नाही, त्यांनी चुकीच्या माणसाला काळे झेंडे दाखवले आहे. वनविभागाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि काँग्रेस सत्तेत आहे. त्यांनी त्यांच्याकडे झेंडे दाखवले तर बरोबर राहतात. भंडाराच्या जनतेला विनंती आहे की इथं डीएएफओ राहतात आणि सीएफओ राहतात, त्यांची नाव मागितली होती. त्यांच्या नावाचा उल्लेख भाषणात करायचा होता. तीन तीन वर्ष काम होत नाहीत त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन निदर्शनं करा. तुम्ही योग्य ठिकाणी काळे झेंडे दाखवले तर नक्कीच काम होईल. भंडाऱ्यात तम्ही त्या अधिकाऱ्यांकडे जा आणि निदर्शनं करा, भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील सांगणं आहे निदर्शनं करा. जनतेला त्रास देण्याकरता आणि पैसे खाण्याकरता हे लोक त्रास देत आहेत. त्यामुळं कायदा हातात घेऊन यांचा प्रतिकार करणं चूक नाही. खासदार साहेब, त्यांच्या ऑफिस समोर काळे झेंडे दाखवायला जा, काँग्रेस वाल्यांनाही घेऊन जा, असं नितीन गडकरी म्हणाले.
Traffic Police Fine : वाहतूक पोलिसांचा अजब कारभार, रिक्षा चालकाला चक्क हेल्मेट न घातल्याचा दंड
“झुंडला ऑस्कर पुरस्कार मिळायला हवा”, सिनेमा पाहून हिंदीतील टॉप दिग्दर्शकांची प्रतिक्रिया