मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरात ‘अनलॉक 4’च्या गाईडलाईन्स जारी करण्यात (CM Called Meeting For E-Pass) आल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्सही जारी होणार आहेत. याअंतर्गत ई-पासबाबत उद्या (31 ऑगस्ट) राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होणार आहे. ई-पास सुरुच राहणार की हद्दपार होणार याबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे (CM Called Meeting For E-Pass).
ई-पास संदर्भात राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. कारण, अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. त्यामुळे ई-पास रद्द करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जात होती. त्यासंदर्भात उद्या एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सचिव आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील ई-पास रद्द होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘अनलॉक 4’च्या गाईडलाईन्स जारी
केंद्राने जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, येत्या 7 सप्टेंबरपासून अटी-शर्तींसह मेट्रो सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस मात्र 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तर ओपन एअर थिएटर हे 21 सप्टेंबरपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय येत्या 21 सप्टेंबरपासून सामजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांना 100 लोकांसह परवानगी दिली आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन लावू नये अशी सूचनाही राज्यांना देण्यात आली आहे (CM Called Meeting For E-Pass).
‘अनलॉक-4’मध्ये काय सुरु, काय बंद?
‘या’ गोष्टी बंदच राहणार
केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या विमानांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरु होणार आहे.
Unlock 4 | केंद्राकडून गाईडलाईन्स जारी, मेट्रोला हिरवा कंदील, शाळा-कॉलेज मात्र बंदhttps://t.co/udqEPc8Pxn #Unlock4 #Unlock4 #unlock
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2020
CM Called Meeting For E-Pass
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या सवलतींची मुदत संपणार, 1 सप्टेंबरपासून सामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे मोठे बदल