TV9 Explainer : देवभूमी उत्तराखंडात राजकारणाचं काही खरं नाही, 12 महिन्यात भाजपला चौथ्यांदा मुख्यमंत्री शोधावा लागणार!

| Updated on: Mar 10, 2022 | 5:54 PM

बद्रीनाथ, केदारनाथ अशा पवित्र धामांमुळे देवभूमी असं बिरुद मिरवणारं राज्य म्हणजे उत्तराखंड (Uttarakhand). या तीर्थक्षेत्रांपर्यंत जाण्याची वाट जेवढी खडतर आहे तेवढीच अस्थिर येथील राजकीय स्थिती. राज्य अस्तित्वात आल्यापासून आधी भाजप, नंतर काँग्रेस, पुन्हा भाजप असे वारंवार सत्तांतर झाले. भाजपच्या सत्ताकाळात तर मुख्यमंत्री पदाचे चेहरेही वारंवार बदलले गेले.

TV9 Explainer : देवभूमी उत्तराखंडात राजकारणाचं काही खरं नाही, 12 महिन्यात भाजपला चौथ्यांदा मुख्यमंत्री शोधावा लागणार!
निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर मुख्यालयाकडे जाताना माजी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी
Image Credit source: ANI
Follow us on

Uttarakhand Elections| बद्रीनाथ, केदारनाथ अशा पवित्र धामांमुळे देवभूमी असं बिरुद मिरवणारं राज्य म्हणजे उत्तराखंड (Uttarakhand). या तीर्थक्षेत्रांपर्यंत जाण्याची वाट जेवढी खडतर आहे तेवढीच अस्थिर येथील राजकीय स्थिती. राज्य अस्तित्वात आल्यापासून आधी भाजप, नंतर काँग्रेस, पुन्हा भाजप असे वारंवार सत्तांतर झाले. भाजपच्या सत्ताकाळात तर मुख्यमंत्री पदाचे चेहरेही वारंवार बदलले गेले. अगदी विद्यमान विधानसभेतही (Uttarakhand Assembly) तेच झाले. भाजपातील अंतर्गत कलहाचे परिणाम म्हणून जनता आता काँग्रेसला निवडून देईल, असे भाकितही वर्तवण्यात येत होते. मात्र अशा प्रतिकुल स्थितीतही जनता जनार्दनानं भाजपला कौल (BJP Won) दिलाय. त्यामुळे एकिकडे विजयाचा आनंद आहे तर अंतर्गत बंडाळीवर मात करत मुख्यमंत्रीपदाचा स्थिर चेहरा देण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे.

विधानसभा निवडणूक 2022 चे निकाल काय?

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत पुढीलप्रमाणे पक्षीय बलाबल दिसून आले.
भाजप-29
काँग्रेस- 19
आप- 0
अपक्ष- 04
एकूण जागा- 70

मुख्यमंत्र्यांची खुर्ची स्थापनेपासून अस्थिरच

9 नोव्हेंबर 2000 मध्ये उत्तराखंड अस्तित्वात आले. भाजपने तेथे नित्यानंद स्वामी यांना मुख्यमंत्री बनवले. त्यानंतर अंतर्गत कलहामुळे सातत्याने मुख्यमंत्री बदलत राहिले. कधी भाजप सत्तेवर आली तर कधी काँग्रेस. मात्र बहुतांश वेळा भाजपतील अंतर्गत गटबाजीमुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा सातत्याने बदलावा लागला. तेव्हापासून 2017 पर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत नित्यानंद स्वामी (भाजप), भगसिंह कोश्यारी (भाजप), नारायण दत्त तिवारी (काँग्रेस), भुवन चंद्र खंडूडी (भाजप), रमेश पोखरियाल निशंक (भाजप), पुन्हा भुवन चंद्र खंडूडी, त्यानंतर विजय विजय बहुगुणा (काँग्रेस), हरीश रावत (काँग्रेस) यांचा समावेश राहिला. 2016 मध्ये हरीश रावत सरकार पाडण्यात भाजपने मोठी भूमिका बजावली, असं म्हणतात. त्यानंतर 2017 मध्ये भाजप पूर्ण बहुमतात आली. त्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे ग्रहण काही सुटले नाही.

2017 नंतर प्रचंड उलथापालथ

अनेकदा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलण्यामुळे उत्तराखंड राज्याची देशातील अस्थिर राज्यांमध्ये नोंद झाली आहे. 2017 मधील ची स्थिती पाहता विधानसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने विजयी झाले. त्यावेळी त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्रिवेंद्र प्रचंड बहुमतातील सरकारला फक्त 1453 दिवसच चालवू शकले. त्यानंतर 116 दिवसांसाठी तेथे तीरथ सिंह रावत मुख्यमंत्री झाले. निवडणुकीच्या 246 दिवस आधीच पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचा लाभ काँग्रेसला होईल, असा एक सूर निघत होता. मात्र जनतेने भाजपच्या पारड्यात मत दिले. अशा प्रकारे 12 महिन्यात तीन मुख्यमंत्री लाभल्यानंतर भाजपाला चौथ्यांदा मुख्यमंत्री शोधावे लागणार आहेत.

आता तरी स्थिर मुख्यमंत्री मिळणार का?

मागीत पाच वर्षात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यानंतरही भाजपच्या हाती जनतेनं सत्ता दिलीय. त्यामुळे आता आगामी विधानसभेवर मुख्यमंत्री पदी कुणाची वर्णी लागणार, हा सध्या उत्तराखंडमधील राजकीय चर्चेचा मुख्य विषय आहे. केवळ पाच महिन्यांची सत्ता सांभाळून भाजपला बहुमत मिळवून देणारे पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री होतील? की सत्ता हाती आल्यानंतर आणखी कुणाच्या मनातली खुर्चीची इच्छा दाटून येईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इतर बातम्या-

पंजाबमध्ये काँग्रेसला सोडणाऱ्या ‘कॅप्टन’चाच पराभव; नेते कॉंग्रेसला आजच सोडून जातात असं नाही, पण सोडून गेलेले, नवा पक्ष काढलेल्या नेत्यांचे पुढे झाले काय..?

Election Results 2022: “बुलडोझरसमोर काहीही येऊ शकत नाही..” हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया

4 राज्यात भाजपाला घवघवीत यश, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष