नवी दिल्ली – उत्तराखंडचे (Uttarakhand) मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांनी अपेक्षेप्रमाणे चंपावत (Champavat) विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसच्या निर्मला गहातोडी यांचा विक्रमी 54,121 मतांनी पराभव केला. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. या विजयामुळे पुष्कर धामी यांनी आपली खुर्ची वाचवली आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपला सत्तेत आणणाऱ्या पुष्करने या विजयाने स्वत:ला ‘फायर’ असल्याचे सिद्ध केले आहे. 31 मे रोजी मतदान झाले होते. मतमोजणीच्या 13 टप्प्यांत पुष्कर सिंह धामी यांना एकूण 57268 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार निर्मला गहातोडी यांना अवघ्या 3147 मते मिळाली आहेत. तसेच समाजवादी पार्टीचे उमेदवार मनोज कुमार यांना 409 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार हिमांशू गारकोटी यांना 399 तर नोटाला 372 मते मिळाली आहेत.
प्रिय चंपावतवासियों,
हे सुद्धा वाचाचंपावत उपचुनाव में आपके द्वारा वोटों के माध्यम से बरसाए गए प्रेम व आशीर्वाद से मन अत्यंत भावुक है, नि:शब्द हूं।@narendramodi @JPNadda @AmitShah @rajnathsingh @JoshiPralhad@dushyanttgautam @BJP4India @BJP4UK pic.twitter.com/VH5egOEW2l
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) June 3, 2022
पुष्कर सिंग धामीने या विजयासह इतिहास रचला आहे. पुष्कर सिंग धामी यांनी उत्तराखंडमधील विधानसभा पोटनिवडणूक सर्वात मोठ्या फरकाने जिंकली आहे. यापूर्वी हा विक्रम माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्या नावावर होता. त्यांनी 2012 च्या सितारांगज पोटनिवडणुकीत प्रकाश पंत यांचा 39,954 मतांनी पराभव केला होता. आज मोठ्या फरकाने विजय मिळविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. तसेच त्यांनी योग्य काम केल्याने त्यांना मतं मिळाली आहेत. पुढचा विकास ते योग्य पद्धतीने करतील असं मोदी यांनी म्हटलं आहे.
Congratulations to Uttarakhand’s dynamic CM @pushkardhami for the record win from Champawat. I am confident he will work even harder for the progress of Uttarakhand. I thank the people of Champawat for placing their faith in BJP and laud our Karyakartas for their hardwork.
— Narendra Modi (@narendramodi) June 3, 2022
पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा भाजपला सत्ता दिल्याबद्दल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे आभार मानले आहेत. त्यांनी 23 मार्चला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. सहा महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं. चंपावत मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे कैलास गहातोडी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी जागा सोडली होती. काँग्रेसने निर्मला गेहतोडी यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभे केले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा मोठा विजय सुनिश्चित करण्यासाठी कॅबिनेट मंत्र्यांनी प्रचारात पूर्ण ताकद पणाला लावली होती. याशिवाय चार आमदार दुर्गम भागात 15 दिवस राहिले होते.
विशेष म्हणजे धामी यांनी स्वतः येथे अनेकदा प्रचार केला आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांच्यासाठी रॅली काढली होती.