पुणे : राजधानी दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची धामधूम सुरु आहे. मात्र त्याचवेळी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीदरम्यान चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीची वेगळीच रणनीती सुरु आहे. वंचित आघाडीची पुण्यात महत्वपूर्ण बैठक झाली. वंचित आघाडी सरकारविरोधात काम करणार आहे. शेतकरी प्रश्नावर आंदोलन मोर्चे काढून शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जायचं की नाही याचा निर्णय लवकरच करण्यात येणार आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम वंचितकडून तयार करण्यात येत आहे. या बैठकीला प्रकाश आंबेडकर, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण मानेंसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
स्पेशल रिपोर्ट | टार्गेट विधानसभा, वंचित आघाडी कुणाचा खेळ बिघडवणार?
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वंचित आघाडीचा मोठा फटका बसला. वंचितच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी लाख-लाख मतं मिळाली. त्यामुळे वंचितचा धसका आघाडीने घेतला आहे. त्यांना विधानसभेला सोबत घेण्याची तयारी आघाडीने केली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर आघाडीत जाण्यास तयार होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
संबंधित बातम्या
विधानसभेसाठी मनसेला सोबत घ्या, महाआघाडीच्या बैठकीत सर्वांचाच सूर
प्रकाश आंबेडकरांना हरवणाऱ्या संजय धोत्रेंना मंत्रिपद!
कोल्हापूर पॅटर्न! धैर्यशील माने आशीर्वादासाठी राजू शेट्टींच्या घरी, आई म्हणाली….!
वंचितसाठी दरवाजे खुले, आघाडीच्या बैठकीनंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
राज आणि प्रकाश आंबेडकरांच्या सभांना गर्दी, तरीही भाजपला इतक्या जागा कशा?