बारामती लोकसभा मतदार संघासाठी मनसेने कंबर कसली, रणनिती ठरली, वाचा सविस्तर…

| Updated on: Oct 20, 2022 | 1:22 PM

2024 च्या लोकसभा निवडणुकीतील रणनितीविषयीही मनसेचं धोरण ठरलं आहे. वाचा...

बारामती लोकसभा मतदार संघासाठी मनसेने कंबर कसली, रणनिती ठरली, वाचा सविस्तर...
Follow us on

पुणे : राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर मनसे अधिक अॅक्टिव्ह झाली आहे. आज पुण्यात मनसेच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या नेतृत्वात हे शक्तिप्रदर्शन झालं. यावेळी बोलताना मनसेची पुढची राजकीय समीकरणं काय असतील यावर वसंत मोरे यांनी भाष्य केलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील रणनितीविषयीही ते बोलले. विशेषत: बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी (Baramati Loksabha Constituency) त्यांनी महत्वपूर्ण भाष्य केलं आहे.

आज मनसे पक्षात अनेकांचा पक्षप्रवेश होतोय. यात भोर, वेल्हे, मुळशी या भागातून कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. आजच्या होणाऱ्या सर्व नियुक्ती आणि पक्षप्रवेश या बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे येत्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघात आमची ताकद वाढणार आहे, असं वसंत मोरे म्हणालेत.

मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संतोष दसवडकर यांची निवड करण्यात आली आहे, असंही मोरेंनी सांगितलं.

पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांनी आज शक्ती प्रदर्शन केलं. शक्ती प्रदर्शन करत वसंत मोरे पक्ष कार्यालयात आले. आज मनसेच्या पक्ष कार्यालयात राज ठाकरेंच्या उपस्थितीत अनेकांचा मनसेत प्रवेश झाला.

मनसे नेते अविनाश जाधव यांनीही या पक्षप्रवेशावर भाष्य केलं. पुण्यात वसंत मोरे उत्तम काम करत आहेत. ते लोकांनी पाहिलं आहे. मनसेत आज आणि उद्या प्रवेश सुरूच राहतील. आधी जशी पुण्यात मनसेची ताकद होती, तशीच ताकद पुन्हा एकदा निर्माण होईल. कोणतीही गोष्ट ही येणाऱ्या निवडणुकीची तयारी असते, असं अविनाश जाधव म्हणालेत.