ठाणे : मनसे अध्यक्ष यांच्या ठाण्यातील उत्तर सभेची सुरुवात झाली, ती वसंत मोरे (Vasant More MNS) यांच्या दणदणीत भाषणानं. वसंत मोरे यांनी उत्तरसभेचा श्रीगणेशा केला. यावेळी त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन उपस्थितांचं लक्ष केंद्रीय केलं. भाजपनं दिलेल्या ऑफरवही वसंत मोरे यांनी उघडउघड भाष्य केलं. वसंत मोरे यांना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर धुडकावून लावल्याचही वसंत मोरे यांनी यावेळी आपल्या भाषणात स्पष्ट केलंय. या भाजपच्याच नगरसेवकाला धूळ चार वसंत मोरे हे पुणे पालिकेत नगरसेवक (Corporator in PMC) म्हणून निवडून येत आहेत, असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. पुणे शहराध्यक्ष म्हणून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर वसंत मोरे हे चर्चेत आले होते. त्यामुळे मनसेतील राजकीय वातावरण तापल्याचं बोललं जात होतं. मात्र उचलबांगडी झाल्यानंतरही वसंत मोरे यांनी आपलं मनसे प्रेम कायम असल्याचं स्पष्ट केलं होतं.
वसंत मोरे तुम्ही भाजपात आलात, तर तुम्ही निवडून याल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पण मी त्यांना भाजपच्याच उमेदवाराला हरवत आलेलो आहे, असं म्हणत भाजपची ऑफर नाकारली असल्याचं म्हटलंय.
वसंत मोरेंना सगळ्यात आधी भाषण करायला दिलं जावं, अशी सूचना राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना केली होती. त्याप्रमाणं वसंत मोरे यांनी उत्तरसभेत पहिलं भाषण केलं. मनसेच्या दोन नगरसेवकांनी पुणे पालिकेत भरीव काम केल्याचं पुनरुच्चार वसंत मोरे यांनी केला.
शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आल्यानंतर वसंत मोरे यांना शिवतीर्थावर बोलावणं आलं होतं. त्यानुसार वसंत मोरे यांनी मुंबईत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली होती. मशिदींवरुन भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे वसंत मोरे हे चर्चेत आले होते. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच राज ठाकरे आणि वसंत मोरे या भेटीला महत्त्व प्राप्त झालं होतं.
वसंत मोरे हे तीन वेळा पुणे पालिकेत निवडून आले आहेत. 2007-2012,2012-2017,2017-आतापर्यंत, अशा तीनवेळेला त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून येण्याची किमया करुन दाखवली आहे. भाजपच्याच उमेदवाराला धूळ चारत त्यांनी पुणे पालिकेवर आपला दबदबा कायम ठेवलाय. मनसेमध्ये येण्याआधी वसंत मोरे हे शिवसेनेमध्ये होते. कात्रजमधून नगरसेवक म्हणून तीनवेळा निवडून आलेले आहेत.
वसंत मोरे यांच्या मोठ्या भावाच्या मुलीचं लग्नसोहळा आहे. या लग्नकार्याचे कार्यक्रम सोडून वसंत मोरे हे मनसेच्या ठाण्यातील सभेसाठी हजर राहिले होते. त्यामुळे त्यांनी मनसेतील निष्ठेवरुनही अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत.