मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून खळबळजनक आरोप करण्यात आलाय. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात दिल्लीत बैठक झाली, असा दावा वंचितने (Prakash Ambedkar sharad pawar) केलाय. शरद पवार यांनी याबाबत खुलासा करावा, अशीही मागणी वंचितकडून (Prakash Ambedkar sharad pawar) करण्यात आली आहे. 10 सप्टेंबरला दिल्लीत बैठक झाल्याचा वंचितचा दावा आहे.
वंचितमुळे भाजपला फायदा होत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी शनिवारी सकाळी केलं होतं. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचितकडून हा दावा करण्यात आला. वंचितवर आरोप करण्यापेक्षा दिल्लीत गुप्त बैठक कशामुळे झाली, असा जाब प्रकाश आंबेडकरांनी विचारला आहे.
शरद पवार काय म्हणाले?
मतांचं विभाजन होऊन भाजपला फायदा होत असल्याचं शरद पवार म्हणाले होते. आता एक नवीन पार्टी आलीय, वंचित म्हणजे गरीब, पण तसं नाही.. त्याचा फायदा भाजपला होतोय. धर्मनिरपेक्ष मताची फाटाफूट होत आहे आणि त्यामुळे जातीयवादी पक्षाला त्याचा फायदा होतोय, असं शरद पवार म्हणाले होते.
VIDEO :