अहमदनगर : सध्या वेदांतावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना प्रत्युत्तर मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना विचारले असता, लाखो लोकांना रोजगार मिळून देणारा वेदांतासारखा (Vedanta) प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे ही चांगली गोष्ट नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांकडून प्रयत्न होणं गरजेचं असल्याचेही ते म्हणाले आहेत.
रोहित पवार यांनी वेदांता प्रकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वेदांता प्रकल्पाला महाविकास आघाडीने तळेगाव येथे जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांना ती जागा आवडली देखील होती. त्यांना सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र तरीही प्रकल्प गुजरातला गेला.
मात्र गुजरातमध्ये त्यांना जी जागा प्रकल्पासाठी देण्यात आली आहे, ती जागा त्यांना आवडलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी भाजप नेते राम शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. त्यांनी मला आमदारकीचा राजीनामा देण्याचे चॅलेंज दिले होते. मी त्यांचे चॅलेंज स्विकारले देखील. मात्र आपण दोघेही राजीनामा देऊ असं मी त्यांना म्हटलो. त्यानंतर ते त्याबाबत एकही शद्ब बोलले नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं,