Veer Savarkar: ‘वीर सावरकर हे भाजप आणि आरएसएसचं श्रद्धास्थान कधीच नव्हते!’

| Updated on: Nov 18, 2022 | 10:33 AM

राजकारणासाठी सावरकर यांचा विषय भाजप आणि संघाने घेतला, अशी टीका कुणी केली?

Veer Savarkar: वीर सावरकर हे भाजप आणि आरएसएसचं श्रद्धास्थान कधीच नव्हते!
नेमकी कुणी केली टीका?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : ‘वीर सावरकर हे भाजप आणि आरएसएसचं श्रद्धास्थान कधीच नव्हतं!’, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या वक्तव्यावर माध्यमांनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी बोलताना राऊत यांनी हे विधान केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (BJP And RSS) राजकारणासाठी सावरकर यांचा विषय घेतला, अशी टीका देखील राऊतांनी केली.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान गुरुवारी विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने राजकारण तापलंय. राहुल गांधींच्या वक्तव्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही अडचणीत आणलं आहे, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलंय.

दरम्यान, जे लोकं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रेमी स्वतःला म्हणवून घेत आहेत, ते बनाव करत असल्याची शंकाही देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केली. शिवसेना गेली 10 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करते आहेत. अशी मागणी सावरकर प्रेमींनी शिवसेनेसोबत का केली नाही, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

पाहा स्पेशल रिपोर्ट

राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर संजय राऊत यांनी नाराजीही व्यक्त केली. महाराष्ट्रात सावरकरांबाबत कोणतीही उलटसुलट वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, ही शिवसेनेची भूमिका आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेवर लक्ष केंद्रीत करावं, असा सल्लाही संजय राऊत यांनी यावेळी दिला. सावरकरांवर भाष्य करुन आपलं लक्ष राहुल गांधी यांनी विचलीत होऊ देऊ नये, असंही ते म्हणाले.

सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे आणि काँग्रेसविरोधात काम करायचं असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी काही पुरावेही पत्रकार परिषदेत सादर केले होते. त्यानंतर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण कमालीचं तापलंय.