नवी दिल्ली : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या मुलीने भाजपचा झेंडा हाती धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने मी पक्षप्रवेश करत आहे, अशा भावना विद्याराणीने व्यक्त केल्या. (Veerappan Daughter Vidyarani in BJP)
तामिळनाडूतील भाजप नेते मुरलीधर राव आणि पोन राधाकृष्णन यांच्यासह भाजप नेत्यांच्या उपस्थितीत विद्याराणीने भाजपप्रवेश केला. विविध पक्षांच्या जवळपास एक हजार कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपचा झेंडा हाती धरला. काही दिवसांपूर्वी भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालनेही भाजपमध्ये प्रवेश केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांच्या प्रेरणेतून भाजपमध्ये प्रवेश केला, असं वीरप्पनची मुलगी विद्याराणीने सांगितलं. कुठल्याही जाती-धर्माच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मदत करण्याची आपली इच्छा असल्याचं विद्याराणी म्हणाली. विद्याराणी तामिळनाडूतील कृष्णगिरीमध्ये गेल्या वर्षभरापासून गरजू विद्यार्थ्यांना शिकवते.
Tamil Nadu: Vidhya Rani – daughter of Veerappan, joined BJP in Krishnagiri yesterday, in the presence of party leaders Murlidhar Rao, Pon Radhakrishnan and others. pic.twitter.com/O1TJKGbrMi
— ANI (@ANI) February 23, 2020
वीरप्पनचा हैदोस
ऐंशीच्या दशकापासून वीरप्पनने तामिळनाडूत हैदोस घातला होता. अपहरण, हत्तींची शिकार आणि चंदन तस्करीसाठी तो कुख्यात होता. तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागातील जंगलात तो सक्रिय होता.
वीपरप्पनला पकडण्यासाठी 1990 मध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्य सरकारांनी मिळून विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन केलं होतं. त्यावेळी जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. 18 ऑक्टोबर 2004 रोजी तामिळनाडूच्या विशेष कृती दलासोबत झालेल्या चकमकीत वीरप्पनचा खात्मा करण्यात आला होता. (Veerappan Daughter Vidyarani in BJP)