VIDEO : Budget 2020 : बजेटमध्ये शेरो-शायरीची परंपरा कायम, अर्थमंत्र्यांची काश्मिरी कविता

| Updated on: Feb 01, 2020 | 1:34 PM

अर्थसंकल्प भाषणापूर्वी निर्मला सीतारमण यांनी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित पंडीत दिनानाथ कौल यांची एक कविता वाचली.

VIDEO : Budget 2020 : बजेटमध्ये शेरो-शायरीची परंपरा कायम, अर्थमंत्र्यांची काश्मिरी कविता
Follow us on

Budget 2020 नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकप्ल सादर केला. अर्थसंकप्ल सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं, भारताच्या जनतेने नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांचं समर्थन केलं आहे. हा तुमच्या उद्दीष्ट, आकांक्षा आणि अपेक्षांचा अर्थसंकप्ल आहे आहे (Budget 2020).

बजेटमध्ये शेरो-शायरीची परंपरा कायम ठेवत अर्थसंकल्प भाषणापूर्वी  निर्मला सीतारमण यांनी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित पंडीत दिनानाथ कौल यांची एक कविता वाचली. ही एक काश्मिरी कविता होती. अर्थमंत्र्यांनी या कवितेला काश्मिरा भाषेत वाचलं आणि त्यानंतर हिंदीमध्ये त्याचा अर्थही सांगितला (Nirmala Sitharaman Poem).

“हमारा वतन खिलते हुए शालीमार बाग जैसा
हमारा वतन डल लेक में खिलते हुए कमल जैसा
नौजवानों के गर्म खून जैसा
मेरा वतन, तेरा वतन, हमारा वतन
दुनिया का सबसे प्यारा वतन”

अर्थसंकल्पावेळी निर्मला सीतारमण म्हणाल्या, आम्ही हा अर्थसंकल्प तीन मुख्य विषयांना केंद्रीत करुन तयार केला आहे. यामध्ये महत्वाकांक्षी भारत, आपला सुरक्षित समाज आणि सर्वांसाठी आर्थिक विकास यांचा समावेश आहे.

तसेच, या अर्थसंकल्पात आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आरोग्य विभागासाठी 69,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मेडिकल डिव्हाईसवर जो कर लागतो त्याचा वापर रुग्णालय बनवण्यासाठी करण्यात येईल, असंही अर्थमंत्री म्हणाल्या.

यावेळी त्यांनी ‘टीबी हारणार, देश जिंकणार’ हा अभियानही लॉन्च केला. हे अभियान 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय निर्मला सीतारमण यांनी घेतला आहे.

कोण आहेत कवी दीनानाथ नादिम?

1 मार्च 1916 रोजी श्रीनगर येथे दीनानाथ नादिम यांचा जन्म झाला. नादिम यांनी काश्मिरी कवितांना एक नवी दिशा दिली आणि अगदी काहीच काळात ते 20 व्या शतकातील प्रमुख कवींच्या पक्तींतीत येऊन बसले. तसेच, त्यांनी काश्मीरमधील पुरोगामी लेखक संघटनेचे नेतृत्व केले. त्यांनी काश्मिरी भाषेतच नाही, तर हिंदी आणि उर्दू भाषेतही कविता केल्या आहेत.