अहमदनगर : “डॉ. सुजय विखेंचा विजय हा आनंददायी आहे. मी योग्य उमेदवारासाठी आग्रही होतो. पक्ष जर माझ्यामागे नसेल, तर मुलामागे उभं राहणं हे माझं कर्तव्य होतं”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि भाजपचे नवनियुक्त खासदार डॉ सुजय विखे यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकुटुंब टीव्ही 9 मराठीवर संवाद साधला.