मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajyasabha Election) गनिमी काव्यानं महाविकास आघाडीला (Mahavias Aghadi) शिकस्त दिल्यानंतर आता भाजपचे (BJP) हौसले हे बुलंद झाले आहेत. भाजपने विधान परिषदेसाठीही जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी पडणवीसांनी आत्तापासून जाळं टाकायला सुरूवात केली आहे. महविकास आघाडीचे काही नेते पुन्हा जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन भाजपच्या गोटात तयार झाला आहे. अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीत सेनेचा ऊमेदवार हरल्यानंतर भाजप विधान परिषदेत सगळ्या 6 जागा निवडून आणण्यावर ठाम आहे. मविआ नेत्यांनी आपलं नामांकन परत घ्यावं यासाठी भाजप एक्शन मोडमध्ये आली आहे. त्यासाठी भाजपने नेत्यांची फळीही तयार केली आहे. त्यामुळे पुन्हा राजकारणाच तवा चांगलाच तापला आहे. भाजपने सुरूवातील पाच उमेदरी घोषित केल्या त्यानंतर सदाभाऊ खोत यांना समर्थन देत सहावा उमेदवारही दिला आहे.
त्यामुळे प्रविण दरेकर , चंद्रशेखर बावनकुळेंवर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही करून ऊमा खापरे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांना निवडून आणावे हा पक्षाचा प्रतिष्ठेचा प्रश्न अशा सूचना फडणवीसांनी नेत्यांना दिल्या आहेत. विधानपरिषदेच्या जागेचं नामांकन परत घेण्यासाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी उरला आहे सोमवारी नामांकन परत घेण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे आता या दोन दिवसात राजकारणाची सुत्रं ही वेगाने फिरणार आहेत. एकनाथ खडसे, सचिन अहीर आणि भाई जगताप यांचं भवितव्य अंधांतरीत असल्याची चर्चा भाजपच्या पहिल्या फळीत आहे. हे ३ नेते भाजपच्या रडारवर असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
आता अर्ज मागे घेण्याची तारीख 13 जून 2022 ही असणार आहे. मात्र भाजपचं सध्याचं सख्याबळ पाहिल्यास त्यांचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात अशी स्थिती आहे. मात्र पुरेसं सख्यबळ नसतानाही भाजपने राज्यसभेला सहावा उमेदवार निवडून आणलाच आणि महाविकास आघाडीला शह दिला. तोच प्लॅन भाजपचा या निवडणुकीत असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आता दुसरा झटका देण्यात भाजप आणि फडणवीस यशस्वी होणार का? हे काही दिवसातच कळेल.