‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांचा टोला

| Updated on: Jul 13, 2021 | 2:58 PM

कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवलंय. पंकजा यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय.

कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांचा टोला
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us on

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे समर्थकांनी आज त्यांच्या वरळीतील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना धीर देत राजीनामे देऊ नका, असा आदेश दिलाय. त्यावेळी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. एक स्वल्पविराम द्या, मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामे फेटाळले आहेत. त्याचबरोबर कौरव, पांडवाच्या युद्धाचा उल्लेख करत पंकजा यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवलंय. पंकजा यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावलाय. (Vijay Vadettiwar criticizes BJP over BJP leader Pankaja Munde’s statement )

धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न

पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे. मी पदावर नाही. मी आज तुमच्या पालकत्वाच्या भूमिकेत आहे. मला कशाचीही आवश्यकता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

वडेट्टीवारांचा भाजपला टोला

पंकजा मुंडे यांच्या याच वक्तव्यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. ‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचं त्यांनीच ठरवावं. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ’, अशा शब्दात वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांना टोले लगावले आहेत.

‘ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू’

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. आपण वारकरी आहोत, सात्विक आहोत. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू”

माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले आहे. पंतप्रधानांनी मला झापल्याचं वृत्त काही माध्यमांनी चालवलं. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसं काही दिसतं का? मला पंतप्रधानांनी कधी अपमानित केले नाही. राष्ट्रीय अध्यक्षांनी अपमानित केले नाही, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा

मी लालची नाही, सत्तेची लालसा नाही, कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही; पंकजा मुंडे कडाडल्या

Vijay Vadettiwar criticizes BJP over BJP leader Pankaja Munde’s statement