आता तोंडाला चिकटपट्ट्या लावा, पवारांच्या मुलाखतीनंतर विजय वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Jul 11, 2020 | 6:55 PM

विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीवरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे (Vijay Wadettiwar on Sharad Pawar interview).

आता तोंडाला चिकटपट्ट्या लावा, पवारांच्या मुलाखतीनंतर विजय वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल
Follow us on

नागपूर : काँग्रेसचे नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीवरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे (Vijay Wadettiwar on Sharad Pawar interview). महाविकासआघाडी सरकार पडणार आहे, जाणार आहे अशा वावड्या उठवणाऱ्यांवर या मुलाखतीनंतर तोंडाला चिकटपट्ट्या लावण्याची वेळ आली आहे, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच आघाडीतील मतभेद आणि सरकार कोसळणार अशा चर्चांना प्रत्युत्तर दिलं.

विजय वडेट्टीवार, “शरद पवार यांच्या मुलाखतीतून महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकणार हे स्पष्ट झालं आहे. हे सरकार पडणार, जाणार अशा वावड्या उठवणाऱ्यांनी आता तोंडाला चिकटपट्टी लावण्याची वेळ आली. वावड्या उठवणाऱ्यांना शरद पवार यांच्या मुलाखतीतून सरकार जाणार नाही, त्यांना विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा हा स्पष्ट संदेश मिळाला आहे.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“जेव्हा तीन वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन होतं तेव्हा ते अपघाताने होत नाही, तर विचारपूर्वक होतं. ज्याचा त्याचा स्वतःचा अजेंडा असतो, स्वतंत्र विचार असतो, विचारधारा असते. हे सर्व पाहता अशा गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतात. त्याचे परिणाम चांगले आणि वाईट होत असतात. कोणताही पक्ष आपल्या पक्षाचं नुकसान होईल असा निर्णय घेत नाही. त्यामुळेच तो निर्णय घेतला गेला,” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“तिन्ही पक्षांचं हे आघाडी सरकार भक्कमपणे येणाऱ्या संकटाचा सामना करत महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी काम करत आहे. लोकांना गृहित धरुन चालत नाही. कुणाचे चांगले तर कुणाचे वाईट दिवस असतात. मात्र, लोकांना गृहित धरलं तर आज महाराष्ट्रात जे दिसतंय तेच दिसेल,” असंही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

संबंधित व्हिडीओ:


हेही वाचा :

तुम्ही या सरकारचे ‘हेड मास्टर’ आहात की ‘रिमोट कंट्रोल’? संजय राऊत यांच्या प्रश्नांना शरद पवारांची रोखठोक उत्तरं

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला : शरद पवार

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

Vijay Wadettiwar on Sharad Pawar interview