मुंबई | 03 डिसेंबर 2023 : तेलंगणामध्ये सध्या मतमोजणी होत आहे. या सुरुवातीच्या कलात काँग्रेस आघाडीवर पाहायला मिळत आहे. अशातच आता देशभरातील काँग्रेसच्या नेत्यांकडून तेलंगणा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. अशात महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. हा विश्वास व्यक्त करत असतानाच त्यांनी भाजपवर मात्र जोरदार निशाणा साधला आहे. तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या चारही राज्यात काँग्रेस आघाडीवर आहे. हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. दक्षिण भारतात भारतीय जनता पक्षाने जीवाचं रान केलं. मात्र लोकांनी त्यांना नाकारलं आहे. आजच्या निकालातून ते स्पष्टपणे दिसतंय, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मलिकार्जुन खरगे यांनी जी मेहनत केली. राज्यातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारं सरकार जनतेला आता नको आहे. काँग्रेसने सर्व जाती धर्मला एकत्र घेतलं. द्वेषाचं राजकारण इथे चालत नाही. इथे देशाचं राजकारण चालतं. समाजात धर्मात विष पेरण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. त्याला सडे तो उत्तर या चार राज्यातील निकालातून भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे. चारही राज्यात काँग्रेस जिंकणार हा कार्यकर्त्यांकडून फीडबॅक मिळालेला आहे. त्या आधारावरती आम्हाला जिंकण्याचा विश्वास आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
साउथमध्ये भारतीय जनता पक्षाने जीवाचं रान केलं मात्र लोकांनी त्यांना नाकारलं आहे. बीआरएस सरकारने संपूर्ण राज्य उध्वस्त करण्याचं काम केलं. सगळं मंत्रिमंडळ एकाच घरात दिलं गेलं. भ्रष्टाचार झाला. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने जो विश्वास जनतेला दिला. बिअर्सच्या घरात जाणारा पैसा गरीबाच्या घरात देईन यावर जनतेने विश्वास ठेवला आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
राजस्थानमध्ये आता आम्ही मागे असलो तरी बहुमताने सरकार स्थापन करणार हा आमचा विश्वास आहे. विद्यमान सरकारच्या बाबतीत कुठलाही प्रकारचा आरोप नव्हता. त्यामुळे जनतेने काँग्रेसला पसंती दिली. शंभर टक्के काँग्रेस जिंकणार आहे. राजस्थानमध्ये 115 ते 120 जागा येऊन आम्ही जिंकणार आहे, असं म्हणत राजस्थानच्या निकालावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.