नागपूर : नागपुरात लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये मतभिन्नता दिसून येत आहे (Vijay Wadettiwar Vs Nitin Raut). नागपूर जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती स्फोटक आहे. त्यामुळे नागपुरात आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्याची मागणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेतला. तर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही नागपुरात लॉकडाऊन न करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांची परस्पर विरोधी मतं असल्याचं चित्र आहे (Vijay Wadettiwar Vs Nitin Raut).
नागपुरात कोरोनामुळे दररोज 50 जणांचा मृत्यू होत आहे. गेल्या 24 तासांत 2,343 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पण प्रशासन आणि सरकारचे मंत्री लॉकडाऊनबाबत ठोस निर्णय घेताना दिसत नाही. मंत्री विजय वडेट्टीवार आणि पालकमंत्री नितीन राऊत यांची लॉकडाऊनबाबत परस्पर विरोधी मतं आहेत.
नागपुरातील कोरोनाची परिस्थितीत स्फोटक असल्याने वडेट्टीवार यांना नागपुरात आठ दिवसांचं लॉकडाऊन हवा आहे. “कोरोनाच्या बाबतीत नागपूरची परिस्थिती स्फोटक आहेत, लोकांना उपचार मिळत नाहीत. ऑक्सिजनचीही कमतरता आहे. त्यामुळे नागपुरात सर्व पक्षिय बैठक घेऊन आठ दिवसांचं लॉकडाऊन लावावा, याबाबत मनपा आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना सुचना देणार”, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं (Vijay Wadettiwar Vs Nitin Raut).
मात्र, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख लॉकडाऊन न लावण्यावर ठाम आहेत. अनेकांची मगणी असूनही काल झालेल्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय झाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन
मंत्र्यांमध्ये लॉकडाऊनवरुन मतभिन्नता दिसून येते आहे.
नागपूरकरांनो सावधान! मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाईचे गृहमंत्र्यांचे आदेशhttps://t.co/XrcMbabxJt@AnilDeshmukhNCP @NagpurPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2020
Vijay Wadettiwar Vs Nitin Raut
संबंधित बातम्या :
काळजी करु नका, बऱ्या व्हाल, जयंत पाटलांकडून 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना धीर
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागपूरमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत