निवडणूक लढणार नाही, भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार : विजयसिंह मोहिते पाटील

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. विजयसिंहांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केलाय. त्या पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. पण भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचंही विजयसिंहांनी जाहीर केलं. त्यामुळे अजून राष्ट्रवादीतच असलेले विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपाच्या उमेदवारासाठी काम करणार […]

निवडणूक लढणार नाही, भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार : विजयसिंह मोहिते पाटील
विजयसिंह मोहिते पाटील
Follow us on

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. विजयसिंहांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केलाय. त्या पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. पण भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचंही विजयसिंहांनी जाहीर केलं. त्यामुळे अजून राष्ट्रवादीतच असलेले विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपाच्या उमेदवारासाठी काम करणार आहेत.

अकलूजमध्ये पत्रकार परिषद घेऊन विजयसिंह मोहिते पाटलांनी त्यांची भूमिका जाहीर केली. पत्रकार परिषदेला साताऱ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते यांचीही उपस्थिती होती. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी नुकताच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलाय. भाजपाने अजूनही माढ्याचा उमेदवार जाहीर केलेला नसल्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

मी स्वतः निवडणूक लढणार नाही. कोणत्याही नियम आणि अटींसह भाजपात प्रवेश केलेला नाही, असं म्हणत दोन ओळीत विजयसिंह मोहिते पाटलांची पत्रकार परिषद संपली. रणजितसिंह हे विजयदादांच्या आशीर्वादानेच आमच्याकडे आले आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. आता खुद्द विजयसिंह यांनीच भाजपच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचं जाहीर केलंय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत माढा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. माढ्यातून राष्ट्रवादीने विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे आणि मोहिते कुटुंबाचं सोलापूर जिल्ह्यात जमत नाही. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक आता रंगतदार होणार आहे.