अहमदनगर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचा विधानसभा निवडणुकीत विजय व्हावा यासाठी पवार कुटुंबासह अनेक कार्यकर्ते जीवाचे प्राण करत (Women Fasting For Rohit Pawar) होते. रोहित पवार यांच्या विजयासाठी जामखेड तालुक्यातील हळगावमधील एक महिलेने महिनाभरापासून उपवास (Women Fasting For Rohit Pawar) केला. विमल मंडलिक असं या महिलेचे नाव आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्याचे लक्ष लागलेल्या प्रमुख लढतीमधील एक लढत म्हणजेच कर्जत जामखेडमधील. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. रोहित पवार यांनी भाजचे मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. रोहित पवार यांच्या विजयासाठी विमल मंडलिक यांनी महिनाभर उपवास केला (Women Fasting For Rohit Pawar) होता.
गुरुवारी निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर रोहित पवार कार्यकर्त्यांसोबत गुलाल खेळत होते. यावेळी रोहित पवार यांना ही माहिती मिळाली. त्यांनी तातडीने हळगावच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर रोहित पवार यांनी विमल यांच्या भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: च्या हाताने त्यांना घास भरवत मंडलिक यांचा उपवास सोडवला.
रोहित पवार यांच्या विजयासाठी महिनाभर उपवास करणाऱ्या माऊलीच्या रोहित भेटीचा हा क्षण अतिशय भावनिक (Women Fasting For Rohit Pawar) ठरला.
रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले.
संबंधित बातम्या :
कपाळावर भंडारा, बुलेटवर एण्ट्री, रोहित पवारांचं सेलिब्रेशन सुरु