मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत नीट बाजू मांडण्यात आली नाही. 25 जानेवारीपासून अंतिम सुनावणी आहे. जर सरकारची हीच भूमिका राहिली तर मराठा समाजाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारला माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं. (Vinayak mete’s allegation on state government)
विनायक मेटे यांनी आज राज्यव्यापी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मराठा समाजाच्या पहिल्या फळीतील सर्व नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. 3 पक्षाचं सरकार एकत्र येत असेल तर मराठा समाजानेही एकत्र यायला हवं. जर आम्ही एकत्र आलो नाही तर समाजाप्रतिचं कोरडं प्रेम दिसून येईल, असं मत मेटे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे.
सरकार मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला एकत्र येऊ देत नाही. जे लोक आज बैठकीला येणार नाहीत. त्यामागे सरकार जबाबदार असेल, असा इशाराही मेटे यांनी दिला आहे. आजच्या बैठकीत कोण आले आणि काय झालं? याबाबत दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्यात येईल, असंही मेटे म्हणाले.
मराठा समाजातील नेते एकत्र येत नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: बोलले. त्यामुळे कुणाचं किती ऐकायचं हे ठरवा, असं आवाहन मेटे यांनी केलं आहे. मराठा समाजातील नेते एकत्र आले नाहीत, तर समाजाचं नुकसान होणार असल्याचं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष दिलं तर चांगलं होईल, अशी विनंती त्यांनी केली आहे. त्याचबरोबर पवारांनी देशातील इतर गोष्टींमध्ये लक्ष घातलं. पण मराठा आरक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केलं, असा आरोपही मेटे यांनी केलाय. 25 जानेवारीपूर्वी त्यांनी लक्ष घालावं. सगळ्यांना एकत्र आणत नवी रणनिती आखावी, अशी मागणी मेटे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या:
घटनापीठ गठीत करण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला पत्रच दिलं नाही; विनायक मेटेंचा आरोप
Vinayak mete’s allegation on state government