मुंबई : शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी (Ramdas Kadam) शिवसेनेवर (Shiv sena) केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे. रामदास कदम जे काही बडबड करतात त्याला आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नारायण राणे शिवसेना सोडून जात असतानाचा एक किस्सा देखील सांगितला. जेव्हा नारायण राणे हे शिवसेना सोडून चालले होते, तेव्हा हेच रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्कामी होते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
विनायक राऊतांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेत गद्दारीची कीड रामदास कदम यांनीच रुजवली असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना राऊत यांनी म्हटलं की, जेव्हा नारायण राणे हे शिवसेना सोडून चालले होते, तेव्हा रामदास कदम यांनी त्यांच्या बंगल्यावर चार दिवस मुक्काम केला होता. राणे गटात या असं शिवसैनिकांना सांगण्यात कदम हे आघाडीवर होते, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
रामदास कदम यांनी शिवसेना आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते नुसतेच आम्हाला खोके सरकार आणि गद्दार म्हणतात, पण त्याऐवजी त्यांनी गेल्या अडीच वर्षात काय केलं ते जनतेला सांगावे असं कदम यांनी म्हटलं होतं. कदम यांच्या या टीकेला आता विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.