Marathi News Politics Vishwaraj Singh BJP candidate for Rajasthan Assembly Election 2023 Latest Marathi News
Rajasthan Assembly Election 2023 : 25 वर्षांनंतर मेवाडचं राजघराणं निवडणुकीच्या मैदानात; ‘या’ पक्षाकडून उमेदवारी
Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अशात 25 वर्षांनंतर मेवाडचं राजघराणं निवडणुकीच्या मैदानात उरलं आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष आहे. वाचा...
1 / 5
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उदयपूरचं मेवाड राजघराणंही निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे. 25 वर्षांनंतर या राजघराण्यातील सदस्य निवडणूक लढवत आहेत.
2 / 5
राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा या मतदारसंघातून मेवाड घराण्याचे वंशज विश्वराज सिंह भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसचे नेते सीपी जोशी यांच्या विरोधात ते निवडणूक लढवत आहेत.
3 / 5
विश्वराज सिंह यांचा राजकारणाशी दूर- दूरपर्यंत काही संबंध नाहीये. ते आपल्या कुटुंबासह मुंबईत राहतात. कधी-कधी ते उदयपूरला जातात. मात्र यंदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
4 / 5
विश्वराज सिंह यांचे वडील महेंद्र सिंह हे राजकारणात सक्रीय होते. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात ते कार्यरत होते. 1989 त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडून लढवली. 1.90 लाख मतांनी ते विजयी झाले. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले.
5 / 5
विश्वराज सिंह जरी राजकारणात सक्रीय नसले. तरी त्यांना राजकारणाची जाण आहे. त्याचे वडील खासदार होते. आता ते स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपमध्ये प्रवेश करताना, मी कुणाचा हक्क हिरावण्यासाठी आलेलो नाही. तर पक्षादेश पाळून लोकांचं हित जपण्यासाठी आलोय, असं विश्वराज सिंह म्हणाले.