गुवाहाटी : आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेला (Ekanth Shinde) पुढे नेत आहोत. यात शंका नसावी, सगळं काही आनंदी आहे, अशी प्रतिक्रिया बंडखोर एकनाथ शिंदेंनी यांनी गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर येऊन दिली आणि चर्चाला उधाण आलंय. शिवसेनेवर नाराज असलेले एकनाथ शिंदे असं अचानक का म्हणाले? याबाबत आता प्रश्न उपस्थितीत होऊ लागले आहेत. यामुळे शिंदे गटात सर्वकाही अलबेल आहे ना, की भाजप (BJP) दुसऱ्या पर्यायाचा विचार करतोय, अशा शक्यता देखील राजकारणातील जाणकार व्यक्त करतायत. राज्यात सध्या राजकीय घडामोडींना (Maharashtra Political Crisis) वेग आला असून विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तातडीनं दिल्लीला गेले आहेत. ही सत्तास्थापनेची तयारी तर नाही ना, मग अचनाक फडणवीस दिल्लीला का गेले, शिंदेंची अचानक शिवसेनेच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया कशी आली, असे अनेक प्रश्न राजकारणात केंद्रस्थानी आहेत.
50 MLAs are with us: Eknath Shinde, in Guwahati, Assam#MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/PxyH6kxk0R
— ANI (@ANI) June 28, 2022
फोनवर बोलत बोलत एकनाथ शिंदे गेटपर्यंत आले तर प्रतिनिधी त्यांना बोलावणारच हे त्यांनाही माहिती होते. पण माईक समोर धरल्यानंतर मी काहीही बोलणार नाही. आमचे प्रवक्ते दीपक केसरकर सविस्तर भूमिका मांडत आहेत, असंच एकनाथ शिंदेंनी सांगितलं. शिंदेंना स्पष्ट बोलायचं नव्हतं तर अशा रितीने ते गेटपर्यंत आलेच कशाला? शिंदे गटात नक्की काहीतरी वेगानं हालचाली सुरु आहेत, फोनवर बोलणं सुरु आहे.. महत्त्वाची चर्चा सुरु आहे.. असं काहीतरी त्यांना दाखवायचं होतं? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.