कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी (CM) कोल्हापूरकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi government) प्रयोग यशस्वी झाला आहे. मात्र आता तुम्ही निवडणूक आल्यावर गुण्यागोविंदाने काम करा असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, कोल्हापूरमध्ये शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का? तर त्याचे उत्तर होय असेच असेल. काँग्रेसला मतदान करणे पाप असेल तर भाजपाने मेहबुबा मुफ्तीसोबत युती केलीचना? शिवसेनेने भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्त्व सोडले असे होत नाही, कारण भाजप म्हणजे हिंदुंत्त्व नव्हे असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे, भाजप म्हणजे हिंदुत्त्व नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपवाले म्हणतात की आम्हाला बाळासाहेबांचा आदर आहे. मग मी त्यांना प्रश्न करतो की त्यांनी समृद्धी महामार्गाला बाळासाहेंबांचे नाव देण्यासाठी विरोध का केला. त्यांना जर खरचच बाळासाहेबांबद्दल आदर असता तर आमचे युती संदर्भात जे काही बोलणे झाले होते, त्यावरून त्यांनी शद्ब फिरवला नसता. कारण ही सर्व बोलणी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये झाली होती, त्या खोलीला आम्ही मंदिर मानतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
देशात महागाई वाढत आहे, पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. देशात वाढत असलेल्या महागाईवरून देखील मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी राशन तर मोफत दिले, मात्र ते कच्चे खायचे का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपाने विक्रांतच्या पैशातून राशन भरल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आघाडी केली, हा महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यात भाजप-शिवसेनेला खिंडार; मयुर शिंदेंसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
बाळासाहेबांचा आदर आहे म्हणता तर शहांनी दिलेला शद्ब का पाळला नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल