सोलापूर: संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदाच्या वादावरुन संजय राऊत आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक वादावादीत आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनीही उडी घेतली आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण सोनिय गांधी याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती यांनी स्पष्ट केले. (MLA Praniti Shinde on UPA Chairperson controversy)
त्या शनिवारी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी UPA अध्यक्षपदाच्या वादाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र सोनिया गांधी या यूपीएच्या चेअरमन आहेत आणि त्याच आमच्या नेत्या असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी म्हणजे ‘बेसलेस’ मागणी असल्याचे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री आहेत सगळं व्यवस्थित चाललय असं असताना एका अधिकाऱ्याच्या आरोपामुळे राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे योग्य नाही. काही गोष्टीना केंद्र शासनाचा पाठिंबा आहे. काही अधिकाऱ्यांना पण आहे. त्यामुळेच एवढे मोठे आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांवर होतात. केंद्राचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले.
राज्यात लॉकडाऊन होणार नाही. लॉकडाऊन होऊदेखील नये. लॉकडाऊनची झळ गरीबांना जास्त बसते. मास्कचा वापर केला तर परिस्थिती टाळता येऊ शकते. लॉकडाऊन होऊ नये या मताची मी आहे, असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
यूपीएच्या अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवावी, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही.
लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यूपीएमध्ये नसणाऱ्यांनी ही फुकटची वकिली करू नये, असा टोलाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना लगावला.
संबंधित बातम्या:
लक्षात ठेवा, ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला रोखठोक इशारा
(MLA Praniti Shinde on UPA Chairperson controversy)