मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप लवकरच जाहीर होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी (Thackeray Government Portfolio) दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खातेवाटपाची यादी आज (4 जानेवारी) संध्याकाळी 7.30 पर्यंत पाठवली आहे. यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर खातेवाटप जाहीर होईल असे जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे सांगितले (Thackeray Government Portfolio) आहे.
“संपूर्ण महाराष्ट्राला जशी मंत्रिमंडळ खातेवाटपाची प्रतीक्षा आहे, तशीच आम्हालाही आहे. अनेक पत्रकार मित्र त्याबद्दल फोन करून विचारणा करत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आज सायंकाळी 7.30 वाजताच मंत्रिमंडळाची खातेवाटप यादी मा मुख्यमंत्री महोदयांनी मा. राज्यपाल महोदय यांना पाठवली आहे. माननीय महामहीम राज्यपालमहोदय त्यावर लवकरच शिक्कामोर्तब करतील, अशी आशा आहे. असे ट्विट जयंत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळी खातेवाटप जाहीर होईल,” अशी शक्यता वर्तवली जात (Thackeray Government Portfolio) आहे.
माननीय महामहीम राज्यपालमहोदय त्यावर लवकरच शिक्कामोर्तब करतील, अशी आशा आहे.
– जयंत पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 4, 2020
ठाकरे सरकारचा 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मंत्रिपदं मिळाली (Thackeray Government Portfolio) आहेत.
पुढचे दोन दिवस खातेवाटप नाही, दिरंगाईचं कारणही नवाब मलिकांनी सांगितलं
संपूर्ण महाराष्ट्राला जशी मंत्रिमंडळ खातेवाटपाची प्रतीक्षा आहे, तशीच आम्हालाही आहे. अनेक पत्रकार मित्र त्याबद्दल फोन करून विचारणा करत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आज सायंकाळी 7.30 वाजताच मंत्रिमंडळाची खातेवाटप यादी मा. मुख्यमंत्री महोदयांनी मा. राज्यपालमहोदय यांना पाठवली आहे.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 4, 2020
आधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोन मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला 16, शिवसेनेला 14 आणि काँग्रेसला 12 अशी मंत्रिपदं आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्याचे लक्ष खातेवाटपाकडे लागलं आहे.
महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन पाच दिवस उलटले, तरी खातेवाटप जाहीर न झाल्यामुळे तीन पक्षात रस्सीखेच होत असल्याच्या चर्चा होत्या. मंत्र्यांच्या बंगल्यांचं वाटप वेळेत झालं, मात्र खातेवाटपाचा घोळ कायम असल्यामुळे नेमकं कुठे पाणी मुरतंय, असा प्रश्न विचारला जात होता. आधी, काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याच्या चर्चा होत्या, नंतर खातेवाटपही लांबल्याचं बोललं जात आहे.
काँग्रेसचं संभाव्य खातेवाटप
बाळासाहेब थोरात – महसूल, मदत आणि पुनर्वसन
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत – ऊर्जा
विजय वडेट्टीवार – बंदरे, मत्स्य व्यवसाय, ओबीसी
के. सी. पाडवी – आदिवासी विकास
यशोमती ठाकूर – महिला आणि बाल कल्याण
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण
सुनील केदार – दुग्ध विकास आणि पशु संवर्धन
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री कोण?
अनिल देशमुख- गृह
अजित पवार– अर्थ आणि नियोजन
जयंत पाटील– जलसंपदा
दिलीप वळसे पाटील– कौशल्य विकास आणि कामगार
जितेंद्र आव्हाड– गृहनिर्माण
नवाब मलिक– अल्पसंख्याक
हसन मुश्रीफ– सहकार
धनंजय मुंडे– सामाजिक न्याय
शिवसेनेच्या संभाव्य खातेवाटपाची यादी
एकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम
सुभाष देसाई– उद्योग आणि खनिकर्म
अनिल परब– सीएमओ
आदित्य ठाकरे– पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण
उदय सामंत– परिवहन