कोलकाता : पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग (WB-SSC) आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळ भरती घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले कॅबिनेट मंत्री आणि माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee) यांची आता वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना ईडीचे (ED) अधिकारी एअर अॅम्ब्युलन्सने भुवनेश्वरला घेऊन जाणार आहेत. तर दुसरीकडे पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जी यांना आज विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. 23 जुलैरोजी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पार्थ चॅटर्जी यांना अटक करण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी तब्बल चारवेळेस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फोन लावला. मात्र समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे.22 जुलैरोजी ईडीने पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि प्राथमिक शिक्षण मंडळ भरती घोटाळा प्रकरणात पार्थ चॅटर्जी व त्यांच्या सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये तब्बल वीस कोटी रुपयांची रोकड ईडीच्या हाती लागली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
इंडिया टुडेच्या रिपोर्टसनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक होते, तेव्हा तो याबद्दल कोणत्याही एका व्यक्तीला माहिती देऊ शकतो. ज्यामध्ये कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा मित्र अशा व्यक्तींचा समावेश असतो. पार्थ चॅटर्जी यांनी अटकेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चारदा फोन केला. मात्र त्यांना समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.कृपया पुन्हा प्रयत्न करा हेच त्यांना ऐकावे लागले. ईडीने 22 जुलैरोजी पार्थ चॅटर्जी व त्यांच्या सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापेमारी केली होती. या छाप्यामध्ये अधिकाऱ्यांनी तब्बल वीस कोटी रुपयांची रोकड आढळून आली आहे.ज्यामध्ये पाचशे आणि दोन हजारांच्या नोटांच्या बंडलांचा समावेश आहे.
आज पार्थ चॅटर्जी यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्यासाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने भुवनेश्वरला नेण्यात येणार आहे. तर त्यांच्या सहकारी असलेल्या अर्पिता मुखर्जी यांना आज विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे. चाटर्जी यांच्यावर पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि प्राथमिक शिक्षण मंडळ भरती घोटाळ्याचा आरोप आहे.