शिवसेनेतील उरल्या-सुरल्या आमदारांचे काय? नारायण राणेंची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार का?

| Updated on: Oct 02, 2022 | 3:27 PM

शिनसेनेतील बंड हे काही एका दिवसाचे नव्हते. आताही ते सुरुच आहे. आमदार-खासदार नंतर आता पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. शिवसेनेचा शेवट जवळ आला असून ते सावरायला आता कोणी नाही असेही राणे म्हणाले आहेत.

शिवसेनेतील उरल्या-सुरल्या आमदारांचे काय? नारायण राणेंची ती भविष्यवाणी खरी ठरणार का?
मंत्री नारायण राणे
Follow us on

महेश मुंजेवार Tv9 प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील राजकारणात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप तर सुरु आहेतच पण भाजपाचे मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता निमित्त होते ते वरळी येथील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केला त्याचे. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये ते उरले-सुरले आमदारही (Shivsena MLA) हे शिंदे गटात प्रवेश करतील अशी भविष्यवाणी नारायण राणे सांगितली आहे. शिवाय शिवसेना प्रमुख असते तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री हे झालेच नसते. कारण त्यांना माहित होते की पदाला न्याय कोण देऊ शकतो आणि कोण नाही? असे म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच सवाल उपस्थित केले आहेत.

Narayan Rane | 'शिवसेनेचे उरले-सुरले आमदारही लवकरच जातील' राणे-tv9

शिनसेनेतील बंड हे काही एका दिवसाचे नव्हते. आताही ते सुरुच आहे. आमदार-खासदार नंतर आता पदाधिकारी देखील शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेचा शेवट जवळ आला असून ते सावरायला आता कोणी नाही असेही नारायण राणे म्हणाले आहेत.

शिवसेनेचे हिंदूत्व आणि नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली आणि उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. त्यामुळे त्यांनीच खरी गद्दारी केली. याउलट एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांनी योग्य निर्णय घेतला असून तोच हिंदूत्वासाठी हिताचा असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

शिवसेना पक्षाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे शिवसैनिक हे शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेची जी अवस्था झाली त्याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

राज्यात आता विरोधी पक्ष केवळ नावालाच उरलेला आहे. कॉंग्रेसला मायबाप नाही अशी अवस्था आहे तर इतर कोणी प्रभावी नाही. त्यामुळे आता फक्त भाजप म्हणा आणि विरोधी पक्ष केवळ औषधाला अशी स्थिती झाल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडीची स्थापना केवळ स्वत:ला मुख्यमंत्री मिळावे म्हणून करण्यात आली होती. हा त्यांचा उद्देश साध्य झाला पण दुसरीकडे पक्षाची होत असलेली वाताहात त्यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे स्वार्थापोटी आज शिवसेनेची ही अवस्था झाल्याचा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे.