संदीप जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 डिसेंबर 2023 : पाच राज्यांपैकी राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांची मतमोजणी उद्या होणार आहे. तर, मिझोराम विधानसभेची मतमोजणी सोमवारी 4 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या पाचही राज्यात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला या पाचही राज्यात बळ मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाला या निकालाची उत्सुकता लागली आहे. या पाचही राज्यात काही महत्त्वाच्या आणि तुल्यबळ लढती झाल्या. त्या लढतींमध्ये कोण बाजी मारणार याचीही उत्सुकता लागली आहे. या महत्त्वाच्या लढतींवर टाकलेला एक प्रकाश.
बुधनी -शिवराज सिंह चौहान(भाजप) विरुद्ध विक्रम मस्ताल (काँग्रेस)
छिंदवाडा- कमलनाथ (काँग्रेस) विरुद्ध बंटी साहू (भाजप)
इंदूर-कैलास विजयवर्गीय(भाजप) विरुद्ध संजय शुक्ला (काँग्रेस)
दतिया-नरोत्तम मिश्रा(भाजप) विरुद्ध राजेंद्र भारती(काँग्रेस)
नरसिंगपूर-प्रल्हाद सिंह पटेल(भाजप) विरुद्घ लखन सिंह पटेल (काँग्रेस)
राहली-गोपाल भार्गव(भाजप) विरुद्द ज्योती पटेल (काँग्रेस)
—————————————
झालरापाटन-वसुंधरा राजे(भाजप) विरुद्ध रामलाल चौहान (काँग्रेस)
झोटवाडा-राजवर्धन राठोड (भाजप) विरुद्घ अभिषेक चौधरी (काँग्रेस)
सरदारपुरा-अशोक गेहलोत(काँग्रेस) विरुद्द महेंद्रसिंह राठोड (भाजप)
टोंक विधानसभा-सचिन पायलट (काँग्रेस) विरुद्द अजित सिंह (भाजपा)
अलवर- बालकनाथ (योगी) (भाजप) विरुद्घ इम्रान खान (काँग्रेस)
——————————-
गजवेल- केसीआर राव(BRS) विरुद्ध ई. राजेंद्र (भाजप)
कामरेड्डी-केसीआर राव(BRS) विरुद्ध वेंकट रमण रेड्डी (भाजप)
कोंडगल-नरेंद्र रेड्डी (BRS) विरुद्ध ए रेवंत रेड्डी(काँग्रेस)
चंद्रयानगुट्टा-अकबरुद्दीन ओवैसी (MIM) विरुद्ध सत्यनारायण (भाजप)
जुबली हिल्स-मोहम्मद अझरुद्दीन (काँग्रेस) विरुद्ध मंगती गोपीनाथ (BRS)
सिरसिला-केटी रामाराव (BRS ) विरुद्घ के के महेंद्र रेड्डी (काँग्रेस)
करीमनगर-खा.बी संजय कुमार (भाजप) विरुद्ध कमलाकर (BRS)
गोशामहल-राजा सिंह(भाजप) विरुद्ध
——————————
पा़टन -भुपेश बघेल (काँग्रेस) विरुद्ध विजय बघेल(भाजप) काका पुतण्यात लढत
सितापूर-अमरजीत भगत(काँग्रेस) विरुद्ध गोपाल राम(भाजप)
मनेंद्रगड-विनय जायस्वाल(काँग्रेस) विरुद्द श्याम जायस्वाल(भाजप)
बिलासपूर-अमर अग्रवाल(भाजप) विरुद्ध शैलेश पांडे(काँग्रेस)
रायगड-प्रकाश नायक(काँग्रेस) विरुद्ध रोशन लाल(भाजप)
जांजगीर चंपा-नारायण चंदेल(भाजपा) विरुद्ध व्यास कश्यप (काँग्रेस)
——————————-
आईजोल ईस्ट-जोरमथंगा (MNF) विरुद्ध लालथानसांगा(ZPM)
सेरछिप- लालडुहोमा (ZPM) विरुद्ध के नवागंतुक जे. माल्सावमज़ुअल वानचावंग (MNF)
आइजोल पश्चिम-III-वी.एल. ज़ैथनज़ामा (ZPM) विरुद्ध लालसावता (काँग्रेस) विरुद्ध के. सॉमवेला (MNF)
हच्छेक-लालरिडिका राल्टे (काँग्रेस) विरुद्ध रॉबर्ट रोमाविया रॉयटे (MNF)