ईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले?

| Updated on: Aug 23, 2019 | 7:51 PM

एरवी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं देणारे राज ठाकरे ईडीच्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तरं देतील आणि त्यांना काय प्रश्न विचारले जातील याची उत्सुकता प्रत्येकालाच होती. अखेर पावणे नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे बाहेर पडले आणि कृष्णकुंजवर कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

ईडीच्या चौकशीत राज ठाकरेंना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले?
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ED) यांची अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) गुरुवारी पावणे नऊ तास चौकशी करण्यात आली. कोहिनूर टॉवर प्रकरणी ही चौकशी (Raj Thackeray ED) होती. एरवी पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं देणारे राज ठाकरे ईडीच्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तरं देतील आणि त्यांना काय प्रश्न विचारले जातील याची उत्सुकता प्रत्येकालाच होती. अखेर पावणे नऊ तासांच्या चौकशीनंतर राज ठाकरे बाहेर पडले आणि कृष्णकुंजवर कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

ईडी चौकशी नेमकी कशामुळे?

कोहिनूर टॉवरमुळे अनेक जण अडचणीत असून त्यापैकी राज ठाकरे एक आहेत. नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या मालकीची असलेल्या या मिलची जागा 2004 मध्ये आयएल अँड एफएस आणि कोहिनूर सीटीएनएल यांनी मिळून विकत घेतली. यावेळी आयएल अँड एफएसचा हिस्सा 50 टक्के आणि सीटीएनएलचा हिस्सा 50 टक्के होता. आयटीएनएलमध्ये मातोश्री रिएलटर्स एक भागीदार कंपनी होती. या कंपनीचे भागीदार राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे होते. 2008 मध्ये आयएल अँड एफएसने आपला हिस्सा कमी किमतीला विकला. हाच प्रकार ईडीच्या अधिकाऱ्यांना खटकत आहे.

ज्यावेळी आयएल अँड एफएसने आपले सव्वा दोनशे कोटी रुपयांचे शेअर 90 कोटी रुपयांना विकून 132 कोटी रुपयाचा तोटा सहन केला, त्याचवेळी सीटीएनएलची भागीदार कंपनीचा एक हिस्सा असणाऱ्या मातोश्री कंपनीला 80 कोटी रुपये फायदा मिळाला. त्यातले 20 कोटी रुपये मातोश्रीचे एक भागीदार राज ठाकरे यांना मिळाले असल्याचा आरोप आहे. एकाच व्यवहारात एका कंपनीला फायदा होतो, तर दुसऱ्या कंपनीला नुकसान होतं हे सर्व ईडीला संशयास्पद वाटत आहे.

सध्या याच संशयास्पद व्यवहाराबाबतचौकशी सुरू आहे. राज ठाकरे यांचीही चौकशी झालीच. यावेळी राज यांना अनेक प्रश्न विचारण्यात आलेत.

  • प्रश्न 1 – तुम्ही कोहिनूर मिल विकत घेताना कोणत्या कंपनीचे भागीदार होता?
  • प्रश्न 2 – कोहिनूर मिलची जागा विकत घेताना पैसे कसे जमवले? कोणत्या कंपनीकडून पैसे घेतले?
  • प्रश्न 3 – आयएल अँड एफएसने आपले शेअर विकल्यानंतर आपण बाहेर पडलात की नंतर?
  • प्रश्न 4 – सीटीएनएलमध्ये कोणकोण भागीदार होते?
  • प्रश्न 5 – 500 कोटी कर्ज घेतल्यावर ते कसे खर्च केले?
  • प्रश्न 6 – कोहिनूर मिलची जागा विकत घेताना आपण किती पैसे गुंतवले, त्याचे पुरावे काय आहेत?
  • प्रश्न 7 – कोहिनूर मिलच्या व्यवहारातून 2008 सालात बाहेर पडताना आपल्याला किती पैसे मिळाले? त्याचे पुरावे काय आहेत?

राज ठाकरे यांची सुमारे साडे आठ तास चौकशी चालली. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यापैकी हे काही महत्वाचे प्रश्न असल्याची माहिती आहे.