Shiv Sena : हीच ती वेळ..! विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेच्या निवडीच्या राजकारणावर दानवेंचे काय आहे स्पष्टीकरण?

| Updated on: Aug 11, 2022 | 5:21 PM

ज्या पद्धतीने शिंदे सरकार सत्तेत आले आहे त्याबाबतीत राजकारण किती खालच्या स्थरावर गेली हे जनतेला कळाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन सभागृहात आवाज उठवणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर मतभेद बाजूला ठेऊन सरकारच्या कारभारावर प्रश्न उठवणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

Shiv Sena : हीच ती वेळ..! विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेच्या निवडीच्या राजकारणावर दानवेंचे काय आहे स्पष्टीकरण?
अंबादास दानवे, विधान परिषद विरोधी पक्षनेते
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : विधान परिषेदेच्या विरोधी पक्षनेतेपदी (Shivsena Party) शिवसेनेचे आंबादास दानवे यांची निवड झाली आहे. मात्र, या निवडीवरुनच महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. यावर काही नेत्यांनी पांघरुन घालण्याचा प्रयत्न केला तर (Congress Party) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र, आपली नाराजी उघडपणे स्पष्ट केली. विश्वासात घेऊन निवड करणे गरजेचे होते. तर (MVA) महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र राहतील असेही काही नाही म्हणत त्यांनी फुटीचे संकेतच दिले होते. पण हे सर्व मतभेद बाजूला सारुन सरकारला अधिवेशनात कोंडीत पकडण्यासाठी तिन्ही पक्षाने एकत्रित काम करणे गरजेचे असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी सांगितले आहे. शिवाय नाराजांबाबत अधिक प्रक्रिया न देता आगामी काळात राज्यातील विविध प्रश्न मांडले जाणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

मतभेद दूर ठेवणे गरजेचे

ज्या पद्धतीने शिंदे सरकार सत्तेत आले आहे त्याबाबतीत राजकारण किती खालच्या स्थरावर गेली हे जनतेला कळाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन सभागृहात आवाज उठवणे गरजेचे आहे. त्यामुळे इतर मतभेद बाजूला ठेऊन सरकारच्या कारभारावर प्रश्न उठवणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, निवड होताच महाविकास आघाडीमधील मतभेद समोर आल्याने आता नवे संकट उभे राहिले आहे. तर दुसरीकडे ही काही नैसर्गिक युती नाही. त्यामुळे आमचा विचार होत नसेल तर वेगळा विचार करवा लागेल असाच इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

विधीमंडळात मांडणारा जनतेचे प्रश्न

सरकार स्थापनेनंतर आता लवकरच विधीमंडळ अधिवेशन सुरु होईल. त्यापूर्वी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे आंबादास दानवे यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या निवडीनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही निवड विश्वासात घेऊन झाली असती तर अधिक चांगले झाले असते मत त्यांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकरी, शेती आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचे दानवे म्हणाले आहेत.

तीनही पक्षांची एकजूट महत्वाची

शिंदे सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आता तिन्हीही पक्षाची ऐकी असणे गरजेचे आहे. अन्यथा ज्या तीव्रतेने एखाद्या विषयावर परखड मत मांडायला पाहिजे तसे होणार नाही. त्यामुळे अधिवेशनात महाविकास आघाडीतील तिन्हीही पक्षाची एकजूट असणे गरजेचे असल्याचे मत दानवे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.