मुंबई : भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र लिहिलंय. 12 जागांच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर ठाम आहेतच, शिवाय काँग्रेसकडून आघाडीसाठी सप्टेंबरपासून कोणताही प्रतिसाद मिळाले नाही, असं त्यांनी म्हटलंय. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चौकटीत आणणे ही प्रमुख मागणी आहे. पण काँग्रेस स्वतःच आम्ही सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचा संदेश देत आहे. याबाबताही त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.
यापूर्वी विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना संयुक्त पत्र लिहिलं होतं. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भारिपला चार जागांची ऑफर देण्यात आली होती. शिवाय आरएसएसवर काय कारवाई करायची याचा एक मसुदा बनवून द्या, असंही म्हटलं होतं. या पत्राला प्रकाश आंबेडकरांनी चार पानी पत्र लिहून उत्तर दिलंय.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही लिहिलेलं संयुक्त पत्र.
@RVikhePatil @Prksh_Ambedkar pic.twitter.com/m7swflK0RF— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 2, 2019
प्रकाश आंबेडकरांचं संपूर्ण पत्र