मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आजपासून विदर्भ दौरा सुरू केला. विदर्भात कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याकडं कसं पाहत असा प्रश्न विचारताच केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला शुभेच्छा.. दुसरीकडं मुंबई महापालिकेसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या सर्व पक्षांची धावपळ सुरू आहे. त्यात सर्व पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होता. यावर नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं अस्तित्व आहेच कुठं. ज्या दिवसी ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचं अस्तित्व संपलं.
तसंच त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित होतं. राज्यात देशात उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व कुठंही नाही. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे.
चांगल्या गोष्टींच कौतुक करावं. जे उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करून दिलं. त्यामुळं त्यांचे धन्यवाद मानलं पाहिजे. पण, काही लोकांना चांगलं बोलता येत नसल्याची टीका नारायण राणे यांनी केली.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी. शिवाय धनुष्यबाण निशाणी शिंदे गटाला मिळणार, असंही राणे म्हणाले.
दसरा मेळावा कोणाचा होणार याचा निर्णय कोर्टात होईल. तो शिंदे गटाच्या बाजूनं लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोकणात नाणार रिफायनरी होणार. कोणाचाही विरोध चालू देणार नाही. नाणार कुठंही बाहेर जाऊ नये, यासाठी मी स्वतः मंत्र्यांना भेटलो.ते संबंधित कंपनीशी पुन्हा बोलताहेत. हीच जागा आम्ही कंपनीला द्यायला तयार आहोत,असंही राणे म्हणाले.
2024 साली भाजपला 303 ऐवजी 403 लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं दौरे सुरू केलेत.