नागपूर : “ईडीची (ED) चौकशी करण्यासाठी दोन वर्षे तयारी करावी लागते. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपवर टीका केल्याने त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली, असं म्हणणे चुकीचं आहे. पण कोहिनूर मिल खरेदी करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे पैसे कुठून आले, याचा विचार सर्वांनी करायला हवा”, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केलं. ते नागपुरात बोलत होते.
नुकतंच राज ठाकरे यांची ईडीने चौकशी केली. भाजपविरोधात भूमिका घेतल्याने त्यांची चौकशी झाली का असा प्रश्न चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आला. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी हे उत्तर दिलं.
भाजपविरोधी प्रचाराने चौकशी झाली म्हणणं चुकीचं आहे, पण कोहिनूर मिल खरेदी करण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे पैसे कुठून आले, याचा विचार सर्वांनी करायला हवा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
EVM वर खापर नको
विरोधक आपल्या पराभवाचं खापर EVM वर फोडतात, पण बूथ पातळीवर चांगली बांधणी केल्याने पेपर बॅलेट आलं तरीही भाजपला इतकीच मतं मिळतील, असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला.
पत्रकार आणि वकिलांना स्टायफंड
पत्रकार आणि वकिलांना पहिले तीन वर्षे सरकार स्टायफंड देण्याचा विचार करत आहे. पुन्हा सरकार आल्यावर हे करु, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे