संभाजी राजे यांची बैठक कुठे आहे माहीत नाही, समाजाची बैठक तर… मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान काय?

| Updated on: Dec 16, 2023 | 1:27 PM

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर कठोर शब्दात टिका करीत आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने भुजबळाचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करू नये असेही जरांगे पाटील यांनी संभाजीनगरातील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

संभाजी राजे यांची बैठक कुठे आहे माहीत नाही, समाजाची बैठक तर... मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान काय?
मनोज जरांगे
Follow us on

संजय सरोदे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर | 16 डिसेंबर 2023 : सरकारला मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेच लागतील. निष्पाप लोकांना अडकविण्याचा प्रयत्न केला तर आमचंही लक्ष आहे. केसेस मागे घेतल्या नाहीत तर आम्ही पुढे बघू असे थेट आव्हानच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केले आहे. छगन भुजबळांनी आपल्या नादाला लागू नये आणि त्याचं ऐकून सरकारने मराठ्यांवर अन्याय करू नये, मराठा आता पहिल्या सारखा राहिलेला नाही असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

बीडमध्ये ज्यांनी कोणी जाळपोळ केली त्याचं समर्थन आम्ही केले नाही. मात्र निष्पाप लोकांवर कारवाई करून अटक केली जात असेल कर तुम्ही भोळे बनू नका. मराठ्यांना माहीती आहे तुम्ही आरक्षणासाठी काय करत आहात. आज सरकार हातात आहे म्हणून झोडून काढणार का ? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. भुजबळ म्हणत आहेत की मी खूप जणांना अंगावर घेतले. परंतू त्यांची गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा असाही इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. कोणताही सर्वे नाही तर ते त्यांना फुकटचं खायला जमतं. आमच्या नोंदी सापडतायत तर देणार नाही म्हणतात. ही तर दादागिरी झाली. आम्हाला कुणाचं देऊ नका, आमचं आहे ते आम्हाला द्या अशीही मागणी त्यांनी केली.

त्यांच्यासाठी मराठ्यांवर अन्याय नको

त्याचं एकूण सरकारने मराठ्यांमध्ये नाराजी निर्माण करू नये. आता पहिल्या सारखा मराठा राहिला नाही, मराठा एक झाला आहे. आता तरी शहाणे व्हा, ही धमकी नाही. त्यांना मी संताजी आणि धनाजी सारखा पाण्यात दिसत आहे. त्यामुळे ते माझ्यावर टिका करीत आहेत. कितीही विरोध करा, आम्ही ओबीसीमधून आरक्षण घेणार असे मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावलं आहे. गुन्हे मागे घेऊ असा शब्द दिला आहे ना? मग त्याला खुश करण्यासाठी मराठ्यांवर अन्याय करणार का ? मराठा आता तुमच्या बाजूने राहणार नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

संभाजी राजे यांची बैठक कुठे ?

संभाजी राजे छत्रपती यांची दिल्लीत बैठक असल्याबद्दल विचारले असता जरांगे पाटील यांनी कुठे बैठक आहे हे माहीती नाही. समाजाची बैठक अंतरवालीमध्येच असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.