मुंबई : भाजपचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री (Amit Shah) अमित शाह हे दरवर्षी गणेश उत्सवाच्या दरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल होत असतात. पण यंदा त्यांच्या दौऱ्याची चर्चा आहे ती, (Raj Thackeray) राज ठाकरे यांची भेट घेणार का यावरुन. याला चर्चेला पार्श्वभूमीही तशीच आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका पार पडत आहेत. शिवाय यापूर्वीच (BJP Party) भाजपाच्या अनेक नेत्यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजप-मनसे यांची युती होणार अशी चर्चा रंगू लागली आहे. पण अमित शाह यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांची भेट होणार नसल्याचेच संकेत दिले आहे. अमित शाह हे लालबागच्या गणपतीचे आणि आशिष शेलार यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेणार आहेत. शिवाय त्यांचे काही नियोजित दौरे आहेत.
दरवर्षी प्रमाणे यंदाही गणरायाच्या दर्शनासाठी 5 सप्टेंबर रोजी अमित शाह हे मुंबईत दाखल होणार आहेत. ते मुंबईतील काही गणेश मंडळातही दाखल होणार आहेत. लालबागच्या राजाचे ते दर्शन घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरच्या गणपती बाप्पांचे ते दर्शन घेणार आहेत. तर एका शाळेचेही ते उद्घाटन ते करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्या भेटी बाबत दरम्यान वक्तव्य केले नाही.
महापालिका निवडणूकांमध्ये मुंबई हे भाजपाचे लक्ष असणार आहे. त्याअनुशंगाने आता मोर्चेबांधणी सुरु असली तर गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक ही महत्वाची मानली जात आहे. शिवाय त्यांच्या दौऱ्यात या बैठकीचाही समावेश असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागल्यानंतरचा हा शाह यांचा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीला वेगळे महत्व आहे.
केवळ महापालिका निवडणूकाच नव्हे तर लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. शिवाय भाजपाच्या लोकसभा मिशन 400 या अनुशंगाने याच महिन्यात केंद्रीय मंत्री राज्यातील विविध लोकसभा मतदार संघात दाखल होत आहेत. बैठकीत अमित शाह काय कानमंत्र देणार हे देखील महत्वाचे आहे.
अमित शाह यांचा दोन दिवासांचा दौरा कसा असेल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या दौऱ्यात राज ठाकरे यांची भेट घेऊन भाजप-मनसे युतीबाबत ते बैठक होईल असे सांगितले जात होते. पण या दौऱ्यात तसा काही उल्लेखही नसल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत.