मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणारच सोबतच दोन लाख रिक्त सरकारी पदांची भरती, गरीब कुटूंबाना LPG गॅस 500 रुपये, शेतकऱ्यांना 300 युनिट वीज मोफत, वृद्धांना दर महिना 6000 रुपये वृद्धापकाळ निवृत्तीवेतन आणि गरीब कुटुंबांना प्रत्येकी 100 यार्डचे मोफत भूखंड अशा विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीआधीच या घोषणा करण्यात आल्या आहेत. 2024 मध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असून सरकार या घोषणांची तत्काळ अंमलबजावणी करेल असे आश्वासन काँग्रेसने दिलंय.
आगामी लोकसभेसोबतच हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी काँग्रेसने निवडणूक आश्वासनांची खैरात केली आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजयाने आनंदित झालेल्या काँग्रेसने आता हरियाणाही जिकंण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
काँग्रेस राज्यसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी ट्विट केले आहे. हरियाणातील भाजप आणि जेजेपीच्या युती सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे. गेल्या 9 वर्षांत हरियाणात बेरोजगारी आणि गुंडगिरी वाढली आहे. दोन्ही बाबतीत हरियाणा देशात पहिल्या क्रमांकावर आहे अशी टीका त्यांनी केलीय.
राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करू. हरियाणात आमचे सरकार बनताच जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील, असे दीपेंद्र हुड्डा म्हणाले आहेत.
आम्ही केवळ आश्वासने देत नाही, तर ती पूर्णही करतो. हिमाचलमध्ये काँग्रेस सरकारने जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. राजस्थानमध्येही आमचे सरकार गरिबांना 500 रुपयांत घरगुती गॅस देत आहे. कर्नाटकमध्येही काँग्रेस सरकार येताच पहिल्या मंत्रिमंडळात दिलेली आश्वासने पूर्ण केली, असे त्यांनी सांगितले.
हरियाणात खट्टर सरकारमध्ये कोणताही महिना वादाशिवाय जात नाही. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देश, विदेशात नावलौकिक मिळवणाऱ्या राज्यातील खेळाडूंवर सरकार अन्याय करत आहे. त्यामुळे खट्टर सरकारचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हरियाणामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण, त्याआधी छापलेल्या नोटांमुळे भाजपने विश्वास गमावला आहे. एवढ्या लवकर विश्वास गमावणारे हे कसले सरकार आहे. देशाला आर्थिकदृष्ट्या पोकळ करण्याचा भाजपचा डाव आहे अशी टीका त्यांनी केली.