मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी रात्री निधन झालं. या घटनेने गोव्यात शोकाकूल वातवरण होते. यासोबतच राजकारणातील एक चांगला नेता भाजपने गमावला. पर्रिकर मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचे निधन झाले आहे. मुख्यमंत्री पदावर असताना निधन होणे अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत. आतापर्यंत 17 मुख्यमंत्र्यांचे निधन मुख्यमंत्री पदावर असताना झाले आहे.
1) मनोहर पर्रिकर
मनोहर पर्रिकर यांचे गोव्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना निधन झाले आहे. त्यांच्या निधनाआधीही देशातील 17 मुख्यमंत्र्याचे पदावर असताना निधन झाले आहे.
2) अन्नादुरई
मुख्यमंत्री अन्नादुरई मद्रासचे पाचवे मुख्यमंत्री होते. त्यांनी 1967 मध्ये मुख्यमंत्री पदाची गादी सांभाळली. 1969 मध्ये मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू करण्यात आले आणि यानंतर 20 दिवसांनी अन्नादुरई यांचे निधन झाले.
3) बलवंत राय मेहता
बलवंत राय मेहता हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. यांचेही निधन मुख्यमंत्री पदावर असताना झाले. मेहता देशातील पहिले असे मुख्यमंत्री आहेत की त्यांचे निधन पाकिस्तानसोबत युद्ध सुरु असताना झाले. त्यांच्या हेलिकॉप्टरला पाकिस्तानच्या वायूसेनेने उडवले होते.
4) बरकतुल्लाह खान
बरकतुल्लाह खान राजस्थानचे एकमेव मुस्लिम मुख्यमंत्री होते. त्यांचे निधन 53 वर्षाचे असताना आयु इथे ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले.
5) बेअंत सिंह
बेअंत सिंह पंजाबचे मुख्यमंत्री होते. यांना पंजाबमधील अराजकाता संपवण्याचे श्रेय जाते. 1995 मध्ये चंदीगड येथील राज्याच्या सचिवालय इमारतीत आत्मघातकी हल्ल्यात त्यांचा खून करण्यात आला.
6) चिमनभाई पटेल
चिमनभाई पटेल गुजरातचे 1973 मध्ये मुख्यमंत्री बनले. 1974 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांना पद सोडावे लागले. मात्र 1990 मध्ये पुन्हा एकदा ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि 1994 मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचे निधन झाले.
7) दयानंद बांदोडकर
पोर्तुगीज मुक्तीनंतर दयानंद बांदोडकर गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. भाऊसाहेब या नावाने बांदोडकरांना गोव्यात ओळखलं जातं. त्यांनी 1963,67 आणि 72 मध्ये निवडणुका जिंकल्या आणि मुख्यमंत्री पदावर असताना 1973 मध्ये त्यांचे निधन झाले.
8) गोपीनाथ बोरदोलोई
गोपीनाथ बोरदोलोई आसामचे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यासोबत चीन आणि पाकिस्तानकडून राज्याची अंखडता सुनिश्चित ठेवण्यासाठी खूप काम केलं आहे. त्यांचे निधन 1950 मध्ये झाले.
9) मारोतराव कन्नमवार
मारोतराव कन्नमवार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. कन्नमवार फक्त एक वर्ष मुख्यमंत्री पदावर होते आणि या दरम्यान त्यांचे निधन झाले.
10) श्रीकृष्ण सिंह
श्रीकृष्ण सिंह बिहारचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचे निधन मुख्यमंत्री असताना 1961 मध्ये झाले. याआधी त्यांनी दुसरे महायुद्ध सुरु असताना(1939-45) दरम्यान जेव्हा भारत गुलाम होता तेव्हा त्यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
11) मुफ्ती मोहम्मद सईद
मुफ्ती मोहम्मद सईद जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. सईद देशाचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचे निधन मुख्यमंत्री पदावर असताना 7 जानेवारी 2016 मध्ये झाले होते.
12) एमजी रामाचंद्रन
एमजी रामाचंद्रन तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते. त्यांना एमजीआर म्हणूनही संबोधले जात होते. देशातील पहिले मुख्यमंत्री आहेत की जे पूर्वी अभिनेता होते. रामाचंद्रन यांनी 1977 ते 1987 असे आपल्या निधनापर्यंत ते मुख्यमंत्री पदावर होते.
13) रविशंकर शुक्ला
रविशंकर शुक्ला मध्ये प्रदेशचे मुख्यमंत्री होते. यांनी महिलांची प्रगती होण्यासाठी खूप काम केलं आहे. शुक्ला यांचे निधन 1956 मध्ये झाले.
14) शेख अब्दुल्लाह
शेख अब्दुल्लाह जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. तीन वेळा त्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळले आहे. त्यांना शेर-ए-काश्मीरही म्हटलं जाते. सत्तेवर असताना 1982 मध्ये त्यांचे निधन झाले.
15) बिधानचंद्र राय
बिधानचंद्र राय पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री होते. विख्यात स्वतंत्रता सैनानी आणि डॉक्टर असलेले बिधानचंद्र राय राजकारणातील एक हुशार असे नेते होते. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती आणि डॉक्टर त्यांना राहणे पसंत होते. मात्र महात्मा गांधीच्या विनंतीमुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. पदावर असताना त्यांचे निधन 1962 मध्ये झाले.
16) वाय एस राजशेखर रेड्डी
वाय एस राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. दोनवेळा ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यांचे निधन हेलिकॉप्टर क्रॅशमुळे 2009 मध्ये झाले.
17) जयललिता
जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. त्यांना प्रेमाने लोक अम्मा म्हणून बोलायचे. जयललिता यांचे निधनही त्या पदावर असताना 5 डिसेंबर 2016 रोजी झाले. जयललिता 1971 ते 2016 अशा पाच वेळा राज्याच्या मुख्यमंत्री पदी होत्या.