Chandrakant Khaire | हा पैठणचा बोका कोण? रावसाहेब दानवे कोणाला म्हणाले बोका? शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कोणाला घेतला चिमटा

| Updated on: Sep 13, 2022 | 12:44 PM

Chandrakant Khaire | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पैठण येथे झालेल्या सभेत मंत्री संदिपान भुमरे यांना बोका म्हटले. त्याचा खरपूस समाचार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला आहे.

Chandrakant Khaire | हा पैठणचा बोका कोण? रावसाहेब दानवे कोणाला म्हणाले बोका? शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कोणाला घेतला चिमटा
बोक्यावरुन चिमटा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

Chandrakant Khaire |   मराठवाड्यातील खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे त्यांच्या खुमासदार शैलीसाठी ओळखले जातात. बोलता बोलता ते समोरच्याही विकेट पाडतात. पण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आज त्यांची विकेट घेतली. ‘पैठणमध्ये आता हा कोण बोका आला,’ असे कार्यकर्ते आपल्याला विचारत असल्याचा टोला खैरे यांनी दानवे यांना लगावला आहे. ही राजकीय शेरेबाजीतून खमंग चर्चा रंगतेय एवढं मात्र नक्की.

खसखस पिकवली

सोमवारी पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेत कमी वेळेतही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली. शिंदे यांना उशीर होत असल्याने त्यांना भाषण आवरते घ्यावे लागले. पण तेवढ्याच वेळात त्यांनी खसखस पिकवली. जनतेने त्यांच्या भाषणाला हसून मनमुराद दाद दिली.

काय म्हणाले दानवे

आपल्या छोटेखानी भाषणात दानवेंनी मंत्री संदिपान भुमरे यांचा उल्लेख पैठणचा बोक्या असा केला. त्यावर एकच खसखस पिकली. उपस्थितांनी त्याला खळखळून दाद दिली. पैठणचा बोक्या खोक्यांना विकला जाणार नाही, असा दावा त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

खैरेंनी काढला चिमटा

आता या सर्व वक्तव्याचा खरपूस समाचार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला आहे. ‘पैठणमध्ये आता हा कोण बोका आला,’ असे कार्यकर्ते आपल्याला विचारत असल्याचा टोला खैरे यांनी दानवे यांना लगावला.

सहकाऱ्याला बोका कसे म्हणता

सत्तेतील आपल्या सहकाऱ्याला कोणी बोका कसे म्हणू शकते? असा सवाल ही खैरे यांनी विचारला.

मग दानवेंना काय म्हणतात

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लोक काय म्हणतात, हे उघड गुपीतही चंद्रकांत खैरे यांनी लागलीच सांगून टाकले. त्यांना चकवा असे म्हणत असल्याची गुगली त्यांनी टाकली.