Abdul Sattar | टीईटी घोटाळ्याचा आळ तरीही मंत्रीपदाची माळ, अब्दुल सत्तारांना लॉटरी कशी काय लागली?

| Updated on: Aug 09, 2022 | 12:08 PM

टीईटी घोटाळ्याशी कनेक्शन उघड झाल्यानंतर अब्दुल सत्तारांचा मंत्रिमंडळातून पत्ता जवळपास कट झाल्याचे बोलले जात असतानाच शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागली, याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र राजकीय दृष्ट्या विचार केल्यास भाजप आणि शिंदे सरकारने अत्यंत विचारपूर्वक मंत्र्याची पहिली लीस्ट बनवल्याचे दिसतेय.

Abdul Sattar | टीईटी घोटाळ्याचा आळ तरीही मंत्रीपदाची माळ, अब्दुल सत्तारांना लॉटरी कशी काय लागली?
अब्दुल सत्तार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ होताना राजकीय वर्तुळात महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता. कोट्यवधी रुपयांच्या टीईटी घोटाळ्याशी संबंधित असे नाव आल्यानंतरही अब्दुल सत्तारांना (Abdul Sattar) मंत्रिपद कसे मिळाले. मंत्रिमंडळ विस्तार जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील (TET Scam) लाभार्थींमध्ये अब्दुल सत्तार यांच्या मुलांचा तसेच मुलींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणार नाही, अशी चर्चा होती. अगदी ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होणार, त्यादिवशीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) मुंबईत आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत अब्दुल सत्तारांनाही आमंत्रण होते. मात्र या चर्चेतून सत्तार यांची समजूत काढली जाईल, अशी शक्यता होती. मात्र मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांची यादी फायनल झाली, तेव्हा सत्तारांचे नाव पुढे आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सत्तारांना ही लॉटरी कशी काय लागली, यावर आता चर्चांना ऊत आलाय.

TET घोटाळ्याशी सत्तारांचे कनेक्शन काय?

राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत शिक्षकांसाठी पात्रतेची परीक्षा घेतली जाते. या शिक्षक पात्रता परीक्षेत 2019 मध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. गैरव्यवहारातून तब्बल 7 हजार 800 अपात्र उमेदवारांना पात्र ठरलण्यात आलं. परीक्षेत गैरहजर, अपात्र, दुबार विद्यार्थ्यांनाही बोगस प्रमाणपत्र वाटण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. कारवाईअंतर्गत या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा बंदी करण्यात आली. तसेच त्यांचे नोकरीचे पदही रद्द करण्यात आले आहे. 3 ऑगस्ट रोजी हे आदेश काढण्यात आले. या प्रकरणी सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावंही निष्पन्न झाली आहेत. हिना कौसर शेख आणि उझमा नहीद शेख अशी या दोघींची नावं आहेत.

मंत्रिमंडळात संधी का?

टीईटी घोटाळ्याशी कनेक्शन उघड झाल्यानंतर अब्दुल सत्तारांचा मंत्रिमंडळातून पत्ता जवळपास कट झाल्याचे बोलले जात असतानाच शिंदेंच्या कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागली, याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र राजकीय दृष्ट्या विचार केल्यास भाजप आणि शिंदे सरकारने अत्यंत विचारपूर्वक मंत्र्याची पहिली लीस्ट बनवल्याचे दिसतेय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या शिंदे-भाजप सरकारकडून मुस्लिम मतदार दुखावला जाऊ नये म्हणून एकमेव मुस्लिम चेहरा असलेल्या अब्दुल सत्तारांना संधी देण्यात आल्याचं बोललं जातंय. तसेच मराठवाड्यात औरंगाबाद हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा समजला जातोय. त्यात सिल्लोड मतदार संघाची राजकीय गणितं जुळवण्यासाठी अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेल्याचं दिसून येतंय.