नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार विधानभवन परिसरात म्हणाले, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ३० ते ३५ आमदारांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. एक वाय प्लस व्यवस्था एका व्यक्तीला देण्याचा खर्च २० लाख रुपये येतो. यांना कशाकरिता वाय प्लस सुरक्षा पाहिजे. ज्यांना गरज असेल त्यांना द्या, असंही अजित पवार यांनी सांगितलं. तो सत्ताधारी असो की, विरोधी पक्षाचा असो. भास्कर जाधव यांच्या घराच्या बाहेर बाँब सापडले. त्यांच्या जीवाला धोका आहे. राजन साळवी यांच्यासंदर्भात काल उपमुख्यमंत्री यांना पत्र दिलं. ते जिथं काम करतात. त्यांनाही धोका आहे. धर्मरावबाबा आत्राम हे लोकप्रतिनिधी असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी सुरक्षित सोडविलं. त्यामुळं वाय प्लस सुरक्षा व्यवस्था देताना तो कुठल्या गटाचा, तटाचा, पक्षाचा बघू नये. महाराष्ट्राच्या एखाद्या नागरिकाच्या जिवाला धोका असेल, तर त्याला सुरक्षा दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.
सीमा वादाचा ठराव मंजूर करत असताना गावांचे उल्लेख आम्ही करायला लावले. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडलं नव्हते. शेवटच्या पुरवणी मागण्या या एक हजार कोटींच्या पुढे जाईल असे वाटलं नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातील मुद्द्यांसाठी आम्ही भरपूर निधी दिला. परंतु या संदर्भात विदर्भाचे प्रश्न आम्ही मांडले तसेच काही बाबतीत दखल घेतली. काही बाबतीत उत्तर समाधानकारक मिळत नाही, असं अजित पवार म्हणाले.
आम्ही सभागृहात चार भ्रष्टाचार मंत्र्यांची पुरावे दिले. परंतु यांनी ठरवलेला आहे सगळ्यांना क्लीन चिट द्यायची, असा आरोपही अजित पवार यांनी केला. जो गट बाहेर पडलेला आहे त्यांच्यातील 35 आमदारांना वाय प्लस सुरक्षा आहे. वाय सुरक्षेला एका आमदार व्यक्तीसाठी वीस लाख रुपये खर्च. कुणीही जनता असो त्याला धोका असेल तर त्याला सुरक्षा द्यायला हवी, अशी सूचना अजित पवार यांनी दिली.
दुसऱ्या आमदारांची सुरक्षा काढली आहे आणि त्यांचे आमदारांना सरकारी खर्चात सुरक्षा देण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. अनिल देशमुख यांना 14 महिने जेलमध्ये राहावं लागलं. फक्त अधिकाऱ्याचा आरोप होता, जर इतर दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने यांच्या आमदारांवर जर आरोप केला तर हे जेलमध्ये जाणार का, असा सवाल अजित पवार यांनी विचारला. आमच्या काळात राहिलेली चूक यांनीही करायला हवी असं काही नाही, असंही त्यांनी सांगितलं.